NCB Raids Saam TV
मुंबई/पुणे

NCB Raids: मुंबईसह दिल्लीत एनसीबीची मोठी कारवाई; १५ कोटींचे अंमली पदार्थ जप्त, दोघांच्या मुसक्या आवळल्या

NCB Raids In Mumbai Delhi: या बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करी रॅकेटला वेळीच फटका बसल्याने अनेकांचे आयुष्य धोक्यात जाण्यापासून वाचले आहे.

Ruchika Jadhav

सचिन गाड

NCB Raids:

अंमली पदार्थांप्रकरणी एनसीबीचं धाड सत्र सुरूच आहे. आजही मुंबई आणि दिल्ली येथून एनसीबीने १५ कोटी रुपयांचे २ किलो कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी झांबियन नागरीकासह एका टांझानियन महिलेला अटक करण्यात आलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवाळी सणात नागरिकांचे जीवन उद्धवस्त करण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी टोळ्यांचा हा डाव एनसीबीने हाणून पाडला आहे. अंमली पदार्थांची तस्करी करत असलेला झांबियन नागरिक गिलमोरबाबत एनसीबी अधिकांऱ्यांना टीप मिळाली होती.

त्यानंतर सापळा रचून त्याच्यावर लक्ष ठेवले असताना तो आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी करणाऱ्या टोळीशी संबधीत असल्याचं एनसीबीने (NCB) अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. अंमली पदार्थ एका व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी गिलमोर एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथेच सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह एमआर ऑगस्टिनो नावाच्या महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि गोव्यात हे दोघे कार्यरत होते.

झांबियाचा रहिवासी असलेला गिलमोर अद्दिस अबाबा येथून भारतात आला होता. पुढील चौकशीसाठी दोघांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

सणासुदीच्या काळात कोकेन आणि विविध ड्रग्जची पार्टी करण्याचे प्रमाण तरुण तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करी रॅकेटला वेळीच फटका बसल्याने अनेकांचे आयुष्य धोक्यात जाण्यापासून वाचले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

Remedies On Sunday: रविवारच्या दिवशी मीठाचे उपाय करणं ठरेल फायदेशीर; करियरमध्ये लाभ होऊन नकारात्मकता दूर होईल

Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कोणता अलर्ट? वाचा सविस्तर

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT