Mumbai NCB Action Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; तब्बल ३० कोटींचं कोकेन जप्त

मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मोठी कारवाई करत ३० कोटी रुपयांचं ७ किलो कोकेन केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतून (Mumbai) एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मोठी कारवाई करत ३० कोटी रुपयांचं ७ किलो कोकेन केलं आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटकही करण्यात आली आहे. (Mumbai News Today)

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी चार आरोपी आफ्रिकन आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई आणि दिल्ली युनिटने १३ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील टिळकनगर भागात जवळपास ५ किलो कोकेन जप्त केले होते.

या महिलेने आणलेले हे ड्रग्ज मुंबईतील मस्जिद बंदर भागातील एका हॉटेलमधून हे ड्रग्ज आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी एनसीबीने तत्काळ पाठपुरावा करून, महिलेला मदत करणाऱ्या दोन इथिओपियन नागरिकांना अटकही केली होती.

दरम्यान, या प्रकरणात अजून तपास केल्यानंतर एका महिलेसह आणखी दोन इथिओपियन नागरिकांना मुंबईतील मस्जिद बंदर येथील हॉटेलमधून एनसीबीने ताब्यात घेतले. अशा प्रकारे एकूण, सुमारे ७ किलो वजनाचे आणि सुमारे ३० कोटी रुपयांचे कोकेन ड्रग एनसीबीने जप्त केले आहे.

याप्रकरणातील आरोपी महिला ही दिल्लीतील ड्रग्ज सिंडिकेट चालणाऱ्या एका टोळीच्या म्होरक्याची पत्नी आहे. इतर आरोपी हे अमली पदार्थ तस्करांच्या सिंडेकेटचा भाग होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card : रेशन कार्डवर PHH की AAY? तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती किलो धान्य मिळणार, लगेच तपासा

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Dates vs Raisins : खजूर की मनुका, दोघांपैकी काय आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर

Less Water Drinking: दिवसभर पाणी कमी पिण्याची सवय ठरू शकते धोकादायक; शरीरावर होतात 'हे' ७ परिणाम

Childhood Cancer: पालकांनो! मुलांमध्ये दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; कॅन्सरचा असू शकतो सुरुवातीचा संकेत

SCROLL FOR NEXT