Nawab Malik News in Marathi, Nawab Malik Money Laundering Case News
Nawab Malik News in Marathi, Nawab Malik Money Laundering Case News Saam Tv
मुंबई/पुणे

नवाब मलिकांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा, खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी

सुरज सावंत

मुंबई: नवाब मलिक यांना मुंबई (Mumbai) सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. त्यांना वैद्यकीय कारणाकरिता जामीन मिळाला नसला तरी, खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार करण्याची विनंती कोर्टाकडून (court) मान्य करण्यात आली आहे. यामुळे नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर आता कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात (hospital) उपचार होणार आहेत. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे. (Nawab Malik News in Marathi)

हे देखील पाहा-

मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी त्यांना देण्यात आली आहे. परवानगी जरी दिली असली, तरी उपचारादरम्यान केवळ कुटुंबामधील एकाच सदस्याला सोबत राहण्याची मुभा मिळाली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्याकडून वैद्यकीय शस्त्रक्रियेकरिता सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता.

किडनीच्या त्रासामुळे नवाब मलिक यांच्या वकिलाने शस्त्रक्रियेची परवानगी मागितली होती. मलिक यांनी वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. अखेर त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. जे. जे. रुग्णालयाऐवजी मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात लवकरात लवकर वैद्यकीय उपचार होणे गरजेचे आहे, असा दावा त्यांच्या वकिलांनी यावेळी केला होता.

मात्र, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याला विरोध करत होती. यामुळे न्या. राहुल रोकडे यांनी मलिक यांच्या वैद्यकीय अहवालाबरोबरच जे. जे.मध्ये आवश्यक सुविधा आहे की नाहीत, याचा अहवाल देण्याचे निर्देश ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मूत्रपिंडाचा आजार असल्याने पायांना सूज येते. शिवाय अनेक आजार आहेत. मूत्रपिंडाच्या आजारावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरुपी उपचार करण्याची इच्छा असल्याने ६ आठवड्याकरिता जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज नवाब मलिक यांनी केला होता.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा

Sanjay Raut : मुंबई महापालिकेने पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी ३ कोटी दिले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT