फडणवीसांनी क्रिमिनल लोकांना पदावर बसवले; मालिकांचा गंभीर आरोप Saam Tv
मुंबई/पुणे

फडणवीसांनी क्रिमिनल लोकांना पदावर बसवले; मालिकांचा गंभीर आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या आरोपांवर नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रया दिली आहे. नवाब मलिक म्हणले की, फडणवीस यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. 2005 ला मी मंत्री नव्हतो. फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्ड संबंधित लोकांना सरकारी बोर्डाचे अध्यक्ष बनवले मुन्ना यादव गुंड आहे तो तुमचा साथी होता त्याला बोर्डवर नियुक्ती दिली की नाही? असा सवाल मलिक यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणले की, हैदर आजम नावाच्या नेत्याला मौलाना आझाद महामंडळवर अध्यक्ष केलं की नाही. त्याची दुसरी बायको बांगलादेशी आहे त्याचा तपास मालाड पोलीस स्टेशन मध्ये तपास सुरू होता.ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला की नाही? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील पहा -

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात गुंडाचे फोन यायचे, मॅटर सेटल करायचे. 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदी झाली. मोदी म्हणाले नोटबंदी करत आहोत दहशतवादी संपवतो असे म्हणले आणि त्यानंतर 8 ऑक्टोबर 2017 मध्ये खोटे नोट प्रकरण समोर आले. फडणवीस प्रोटेक्शन मध्ये हा खेळ सुरू होता. 8 ऑक्टोबर 2017 ला director intelligence ने छापा मारला. तेव्हा बिकेसी मध्ये खोटी 14 कोटी 56 लाख करन्सी पकडली. या बनावट नोटांचा थेट पाकिस्तानशी संबंधआहे. याप्रकरणी मुंबईत आणि पुण्यात एकला अटक झाली. पण ह्याला 8 लाख 80 हजार सांगून प्रकरण दाबले असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

हाजी अरफत त्याला पक्ष बदलून अल्पसंख्याक आयोग चेअरमन केलं. रियाज भाटी कोण होता, ज्याला दोन पासपोर्टसह पकडण्यात आले होते. तो भाजपच्या कार्यक्रमात कसा असायचा. पंतप्रधान या शहरात आले तेव्हा रियाज भाटी याने त्यांच्याबरोबर फोटो काढला होता. पंतप्रधान यांच्या कार्यक्रमात चौकशी करून प्रवेश दिला जातो इथे रियाज भाटीला प्रवेश कसा दिला जातो? रियाज भाटी अंडरवर्ल्डचा माणूस आहे. तो एअरपोर्टवर दोन नकली पासपोर्टसोबत सापडला होता. तो फरार आहे, त्याला फडणवीसांनी आपल्या जवळ का ठेवले होते. फडणवीस यांनी सगळ्या क्रिमिनल लोकांना पदावर बसवले, खोट्या नोटांचे रॅकेट चालवणार्‍यांना पदे दिली. खोट्या नोटांची कारवाई केली तेव्हा वानखडे यांच्या मदतीने फडणवीसांनी हे प्रकरण दाबले होते. रियाज भाटी दाऊदचा माणूस असे खळबळजनक आरोप मलीक यांनी फडणवीसांवर केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: बदामाची पावडर दुधात टाका अन् मिळतील आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Health Tips: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा...

SCROLL FOR NEXT