Mumbai-Ahmedabad Highway Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : देवीची मूर्ती आणायला जाताना आक्रीत घडलं, टँकरने उडवले, भक्ताचा जागीच मृत्यू

Mumbai-Ahmedabad Highway Accident: विरारजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात झाला. देवीची मूर्ती आणण्यासाठी गेलेल्या भाविकाला पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Alisha Khedekar

  • विरारजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर आज भीषण अपघात घडला.

  • पाण्याच्या टँकरखाली सापडल्याने भाविक प्रताप नाईक यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • या अपघातानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत रस्ता बंद केला आहे.

  • मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मनोज तांबे, मुंबई

नवरात्री उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. देवीची मूर्ती आणण्यासाठी गेलेल्या प्रताप नाईक (५५) या भाविकाला पाण्याच्या टँकरने जोरदार धडक दिली. टँकरच्या चाकाखाली सापडल्याने नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास घडला आहे.

गणपती विसजनानंतर भाविकांनी देवीच्या आगमनाची तयारी सुरु केली. रविवारी बहुतेक मंडळांनी देवीच्या मूर्तीचे वाजतगाजत स्वागत केले. आज पासून घराघरात देवीची घटस्थापना करण्यात आली. अशातच विरारमध्ये आज सकाळी अकराच्या सुमारास देवीची मूर्ती आणण्यासाठी प्रताप नाईक निघाले होते. या दरम्यान समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरने नाईक यांना जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, टँकरच्या चाकाखाली सापडल्याने नाईक यांचा जागीच मृत्यू झाला.

अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत महामार्गाला जोडणारा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली असून महामार्गावर जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी अपघातामुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान मनसे कार्यकर्ते या प्रकरणी कोणते ठोस पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025 : देवीची ओटी भरताना 'या' वस्तू पूजेच्या ताटात असायलाच हव्यात

Maharashtra Live News Update: धनगर नेते दिपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस

टीम इंडियाच्या जर्सीचा रंग कधीच का बदलला जात नाही? कारण तुम्हाला करेल आश्चर्यचकित

Heavy Rain : ढगफुटी सदृश्य पावसाने होत्याचे नव्हते केले; शेताला तलावाचे स्वरूप, दोन एकर सोयाबीनची गंज पाण्याखाली

सुनेला अंधार खोलीत डांबून ठेवलं, नंतर साप सोडला; महिला ओरडत राहिली पण.. सासरच्यांकडून छळ

SCROLL FOR NEXT