''नवीमुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे''  प्रदिप भणगे
मुंबई/पुणे

''नवीमुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे''

भाजप आमदार तथा एक मोठा ख्यातनाम बिल्डर आणि डेव्हलपर विरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्ष शेतकऱ्यांना घेऊन पालवा येथे आंदोलन करणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रदिप भणगे

डोंबिवली : भाजप आमदार तथा एक मोठा ख्यातनाम बिल्डर आणि डेव्हलपर विरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्ष शेतकऱ्यांना घेऊन पालवा येथे आंदोलन करणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी डोंबिवलीत आज शेतकाऱ्यांना सोबत घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप आमदार तथा एक मोठा ख्यातनाम बिल्डर, डेव्हलपर आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्यावर टीका केली.

जयदीप कवाडे यांनी सांगितले की मुंबईचे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार मुंबई, ठाणे, डोंबिवली येथे व्यवसाय करीत आहेत. परंतु हा व्यवसाय करीत असताना या विकासकांनी व त्यांच्या साथीदारांनी ठाणे जिल्ह्यामध्ये राहणार्‍या शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केलेली आहे.

ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र यांच्या दमदाटी देऊन, धमकावून त्यांची फसवणूक करून जमिनी बळकावल्या आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करावी. तसेच कवाडे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र सुद्धा दिले आहे. आजच्या पत्रकार परिषदेस पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, डोंबिवली शहर अध्यक्ष संदीप निकुंभ, प्रिया वैद्य, देवेंद्र कोयंडे तसेच शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष बबन तेटमे आणि शेतकरी उपस्थित होते.

नवीमुंबई एअरपोर्टला दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे

पत्रकार परिषदेवेळी नविमुंबई एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला असता जयदीप कवाडे यांनी सांगितले की नवीमुंबई एअरपोर्टला दि.बा.पाटील यांचेच नाव दयावे अशी भूमिका आमच्या पक्षाची आहे.तसेच आमचे कार्यकर्ते उद्याच्या सिडकोवर काढलेल्या मोरच्यात सहभागी होणार आहेत.

शिवसेना पक्ष आता सेक्युलर झाला आहे

भाजप बरोबर जेव्हा शिवसेना होती.तेव्हा त्या सरकार मध्ये शिवसेनेच अस्तित्व नव्हते.आता मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत त्यांना सर्व सेक्युलर पक्षा पाठींबा आहे आणि आता ही सेक्युलर आघाडी झाली आहे.जी शिवसेना भाजप सोबत सत्तेत असताना दबली होती आज ती सेक्युलर झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : बटाटे कापल्यावर लगेच काळपट पडतात? मग फॉलो करा या टिप्स

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Jasmine Oil Benefits For Skin And Hair: थंडीत चेहरा अन् केसांना लावा चमेली तेल, ४-५ दिवसात दिसेल मोठा फरक

Link Road: नवी मुंबईत १४ किमीचा नवा लिंक रोड, एक्सप्रेसवे अन् JNP हाकेच्या अंतरावर येणार, वाचा सविस्तर

ZP Election Date : ४६ दिवस शिल्लक, जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणा कधी?

SCROLL FOR NEXT