Traffic changes for navi mumbai  Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, आजपासून वाहतुकीत मोठा बदल, पुढील २५ दिवस रस्त्याचे काम चालणार

Navi Mumbai traffic, Ghanasoli road construction : घणसोली विभागात अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक पोलिसांनी घणसोलीमधील वाहतूक वळवण्याची घोषणा केली आहे.

Namdeo Kumbhar

Navi Mumbai Traffic Police : आज नवी मुंबईमध्ये वाहतुकीत मोठा बदल करण्यात येणार आहे. घणसोली येथील रस्त्याची कामं (road construction projects) पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतलाय. २७ जानेवारीपासून पुढील २५ दिवस हा बदल असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेय.

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे घणसोली विभागात अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक पोलिसांनी घणसोलीमधील वाहतूक वळवण्याची घोषणा केली आहे. नवी मुंबई मनपाने या 100 मीटरच्या कामाचे कंत्राट अश्विनी इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले असून 27 जानेवारी पासून या कामानिमित्त रस्ते वाहतूक वळविण्यात येणार आहे.

घणसोली गाव ते घणसोली जंक्शन, सद्गुरू हॉस्पिटल ते घणसोली सेक्टर 6 आणि घणसोली शेतकरी शाळा ते सेक्टर 6 मार्गे सदगुरु हॉस्पिटलला जोडणाऱ्या रस्त्यांवर हे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत घणसोली मीनाताई हॉस्पिटल ते घणसोली जंक्शन हे दोन्ही अंडरपास वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.

वाहनचालकांना वाहतूक पोलीसांनी काही पर्यायी मार्ग दिलेत यामध्ये घणसोली गाव आणि घणसोली जंक्शन दरम्यान प्रवास करणारी वाहने महादेव मंदिर आणि डी-मार्ट मार्गे घणसोली सेक्टर 6 मार्गे जातील तसेच घणसोली सेक्टर 6 कडे जाणारी वाहतूक सेक्टर 15, 16, 17 आणि 18 मधील डी-मार्ट मार्गे तळवली गाव मार्गे मार्गी लावली जाणार आहेत. घणसोली जंक्शनवरून घणसोली गावात प्रवेश करणाऱ्या वाहनांना नौसिल नाका, तळवली गाव किंवा दत्तनगर मार्गे प्रवेश दिला जाणार आहे. पुढील 25 दिवस रस्ते बांधकामाचे काम सुरु राहणार असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक पोलीसांनी केलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT