Navi Mumbai Shivsena News Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena : शिंदे, ठाकरे समर्थकांमध्ये पुन्हा वाद; डोंबिवलीनंतर आणखी एका शाखेवर शिंदे गटाचा ताबा

आता नवी मुंबईच्या तुर्भे येथील शाखेवरही शिंदे गटाने कब्जा केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी मुंबई : एकीकडे खरी शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाण कुणाला? यावरून सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर लढा सुरू असतानाच, आता दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते एका वेगळ्याच संघर्षाला सामोरे जात आहे. शिवसेनेच्या  (Shivsena) शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार वाद सुरू आहे. (Shivsena Uddhav Thackeray vs Eknath Shinde)

गुरूवारी सकाळी डोंबिवलीतील शिवसेनेची मध्यवर्ती शाळा शिंदे गटाने आपल्या ताब्यात घेतली. यावरून वाद पेटला असतानाच, आता नवी मुंबईच्या तुर्भे येथील शाखेवरही शिंदे गटाने कब्जा केला आहे. तुर्भे नाका परिसरातील शिवसेनेच्या तीन शाखांवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने (Eknath Shinde)  दावा सांगितलं होतं. दोन्ही कडील कार्यकर्त्यांनी तिन्ही शाखा कार्यालयास आपापले टाळे लावले होते.

दरम्यान, यातील एका शाखेत माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि कार्यकर्त्यांनी टोनही टाळे तोडत प्रवेश केला. यावरून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, ही शाखा युनूस शेख याच्या नावावर असल्याने पोलिसांच्या मध्यस्तीने ती शिंदे गटाला देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी युनूस शेख यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे आता ही शाखाही शिंदे गटाने आपल्या ताब्यात घेतली आहे. शाखा ताब्यात येताच, शिंदे गटाने शाखेवरील जुना बोर्ड हटवत नवीन बोर्डही लावला असल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या तुर्भे नाका परिसरातील तीन शाखा गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहेत. या शाखांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले जाते. मात्र शिंदे गटाच्या कार्यकत्र्यांनी या शाखा बळकावण्याचा घाट घातल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाने केला होता.

दुसरीकडे शाखेचे सर्व देखभाल दुरुस्ती भाडे आम्हीच देत आलोत म्हणून आमचाच हक्क अशी भूमिका शिंदे गटाने घेतली होती. त्यामुळे वाद निर्माण होऊन दिवसरात्र सुरू असलेल्या या शाखांना आता टाळे लावण्यात आले होते. दरम्यान, आता यातील एक शाखा शिंदे गटाने आपल्या ताब्यात घेतली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे मुंबईत पुन्हा उपोषणाला बसणार? सरकारला दिला इशारा

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात ‘नरेंद्र सरेंडर’ आंदोलन

Beed: बायोलॉजीच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट, नातेवाईकांनी बांबूच्या सहाय्याने पुरवल्या कॉपी; VIDEO व्हायरल

Daily Wear Blouse Designs: रोज घालण्यासाठी 5 ब्लाऊज डिझाईन कोणते?

४० हून अधिक गुन्ह्यांतील फरार सराईत चोर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT