navi mumbai  saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai : सीवूड सेक्टरमधील एका इमारतीचा स्लॅब काेसळला; सिडकोनं लक्ष द्यावं रहिवशांची मागणी

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबईतील (navi mumbai) सीवूड सेक्टर 48 मध्ये गुरुकृपा सोसायटीमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. पहाटे चार वाजता घडलेल्या या दुर्घटनेत एक रहिवासी जखमी (injured) झाला आहे. (navi mumbai latest marathi news)

सीवूड सेक्टर 48 मध्ये गुरुकृपा सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये राहणारे संजय पवार या घटनेत जखमी झाले आहेत. पहाटे गाढ झोपेत असताना त्यांच्या फ्लॅटमध्ये चाळीस टक्के स्लॅब कोसळला.

या घटनेत संजय पवार यांच्या कानास गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल कर्यात आले हाेते. त्यांच्या कानास आठ टाके पडले आहेत. या घटनेमुळे सिडकोच्या (cidco) मोडकळीस आलेल्या इमारतींचा (building) प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी रहिवासी करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT