Navi Mumbai Kamothe MNS News Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai : नूडल्स बनवणाऱ्या कंपनीवर अचानक मनसेची धडक; समोर जे आलं ते पाहून अनेकांचे होशच उडाले, पाहा VIDEO

Navi Mumbai Kamothe MNS News : नवी मुंबईतल्या कामोठे परिसरातील एका फूड कंपनीवर अचानक मनसे पदाधिकाऱ्यांनी धाड टाकली. यावेळी समोर जे आलं ते पाहून अनेकांचे होशच उडाले.

Satish Daud

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

नवी मुंबईतल्या कामोठे परिसरातील एका फूड कंपनीवर अचानक मनसे पदाधिकाऱ्यांनी धाड टाकली. यावेळी अतिशय घाणेरड्या जागेत, बुरशी आलेल्या पिठाच्या माध्यमातून नूडल्स बनविले जातं असल्याचं समोर आलं. सदरील कंपनी घाणेरड्या ठिकाणी सॉस तसेच नूडल्स तयार करून नागरिकांच्या जिवाशी खेळ करत असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. या कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मनसेने केली.

प्राप्त माहितीनुसार, नवी मुंबईतील (Navi Mumbai) कामोठे परिसरात कुमार फुड प्रोडक्ट्स ही कंपनी आहे. या कंपनीत रेड चिली सॉस, सोया सॉस, नूडल्स तसेच इतर खाद्यपदार्थ तयार केले जातात. अतिशय घाणेरड्या जागेत कंपनीत हे पदार्थ तयार केले जात असल्याच्या तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या होत्या.

सोमवारी रात्रीच्या सुमारास मनसेने पदाधिकारी अचानक या कंपनीवर धडकले. यावेळी कंपनीत सुरू असलेला घाणेरडा प्रकार उघडकीस आला. यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी (MNS News) आक्रमक भूमिका घेतली. ही कंपनी तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे केली.

विशेष बाब म्हणजे, अगदी काही महिन्यांपूर्वी मनसेने याच कंपनीवर धाड टाकत सुरू असलेला घाणेरडा प्रकार समोर आणला होता. कंपनीत कशा प्रकारे खाद्यपदार्थ तयार केले जातात याचा मनसेने पर्दाफाश केला होता. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने सदरील कंपनीला सील ठोकले होते.

परंतु ज्या कंपनीवर कारवाई करण्यात आली. तिच कंपनी पुन्हा एकदा सुरू झाली. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईवर मनसेने प्रश्नचिन्ह उभं केलंय. एफडीएच्या कोणत्या अधिकाऱ्याच्या आशिर्वादाने रात्रीच्या ही कंपनी सुरू आहे, असा सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी आक्रमक भूमिका देखील मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आबा बागुल यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

Kitchen Hacks : घरातील बाल्कनीत लिंबूचे झाड लावायचे असेल, तर या टिप्स नक्कीच वाचा

मतदानावेळी गोंधळ; शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

T20 World Cup Squad : शुभमन गिलचा पत्ता कट, २ वर्षांपासून संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

Chutney Recipes: 2025 मध्ये जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या 5 चटण्या, नवीन वर्ष सुरू होण्याआधी नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT