Navi Mumbai Saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: नवी मुंबईच्या खारघरमध्ये मोठा राडा; माथाडी कामगारांकडून मनसे कार्यकर्त्यांना मारहाण

Navi Mumbai News: नवी मुंबईच्या खारघरमधील एका रुग्णालयासमोर मोठा राडा झाल्याचं वृत्त हाती आहे. नवी मुंबईत कामगार नेते महेश जाधव यांच्या समर्थक माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

Navi Mumbai News:

नवी मुंबईच्या खारघरमधील एका रुग्णालयासमोर मोठा राडा झाल्याचं वृत्त हाती आहे. नवी मुंबईत कामगार नेते महेश जाधव यांच्या समर्थक माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाच्या परिसरातच माथाडी कामगारांनी मनसे कार्यर्त्यांना ही मारहाण केली आहे. मोठ्या संख्येने असलेल्या माथाडी कामगारांच्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. (Latest Marathi News)

मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर मारहाणीचा आरोप करणारे माथाडी कामगार महेश जाधव हे सध्या नवी मुंबईतील रुग्णालयात आहेत. महेश जाधव दाखल असलेल्या रुग्णालयात मनसे कार्यकर्ते येत होते. त्याचवेळी माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली.

माथाडी कामगारांनी मारहाण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. तर काही मनसे कार्यकर्ते इमारतीत लपायला गेले. मात्र, त्यानंतर माथाडी कामगारांनी त्या इमारतीत जाऊन सुरक्षा रक्षकाच्या खोलीच्या काचा बाहेर फोडल्या. तर काही मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या बाहेरूनच पळ काढळा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठी कामगार सेनेचा मनसेशी संबंध नाही; बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

कामगार नेते महेश जाधव यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेने पत्रक काढत भूमिका जाहीर केली आहे.

'राज ठाकरेंच्या आदेशनुसार, 'मराठी कामगार सेना' या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. 'मराठी कामगार सेना' या संघटनेचा, त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'शी संबंध नसेल. 'मराठी कामगार सेने'च्या पदाधिकारी सदस्यांशी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबंध नसेल, असंही मनसेने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

SCROLL FOR NEXT