Local Train Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: काळीज चर्र होणार! तरूणाला धावत्या ट्रेनमधून ढकललं, ट्रेनचं चाक हातावरून गेलं; तरुणासोबत घडलं भयंकर

Local Train News: उत्तर प्रदेशातील ३२ वर्षांचा तरूण आठवडाभरापूर्वीच मुंबईत आयुष्यभराची स्वप्ने घेऊन आला. संघर्षाचं ओझं माथ्यावर घेऊन स्वप्नांच्या दिशेनं भरारी घ्यायला सुरुवात करतो न करतो तोच एका क्षणी ही सर्व स्वप्ने बेचिराख झाली.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News:

मुंबईजवळच्या नवी मुंबईत घडलेली घटना ऐकून वाचून आणि बघून काळीज चर्र झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशातील ३२ वर्षांचा तरूण आठवडाभरापूर्वीच मुंबईत आयुष्यभराची स्वप्ने घेऊन आला. संघर्षाचं ओझं माथ्यावर घेऊन स्वप्नांच्या दिशेनं भरारी घ्यायला सुरुवात करतो न करतो तोच एका क्षणी ही सर्व स्वप्ने बेचिराख झाली. धावत्या ट्रेनमध्ये भांडण झालं. चौघांनी त्याला ट्रेनमधून ढकलून दिलं. तो ट्रॅकवर पडला. इतक्यात ट्रेनचं चाक त्याच्या हातावरून गेलं आणि तो हात त्याला गमवावा लागला. त्याचा पायही फ्रॅक्चर झाला. सध्या हा तरूण सायन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

कुमार लालजी दिवाकर असं या तरूणाचं नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. आठवडाभरापूर्वीच तो मायानगरी मुंबईत आला. येथूनच जवळ असलेल्या उलवे परिसरात लॉन्ड्रीत नोकरी सुरू केली. २६ एप्रिलला तो नेरूळवरून संध्याकाळी ६ वाजता निघाला. त्यानं गर्दीच्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याच्यासोबत हे सर्व भयंकर घडलं, असं त्याच्या एका नातेवाइकानं सांगितलं.

धावत्या ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?

ट्रेननं नेरूळ रेल्वेस्थानक सोडलं. दिवाकर कसाबसा गर्दी असलेल्या डब्यात शिरलाही. ते बघून डब्यातले चौघे प्रवासी त्याच्यावर चिडले. चौघांनीही त्याला विरोध केला. मारहाण केली. त्यातील एकानं तर त्याला ढकलण्यापूर्वी चाकूनं वारही केला, अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यानं 'हिंदुस्थान टाइम्स'ला दिली.

दिवाकर ट्रेनमधून खाली थेट ट्रॅकवर पडला. ट्रेनचं चाक त्याच्या उजव्या हातावरून गेलं. हात तर गमावलाच, पण पायालाही गंभीर दुखापत झालीय. ट्रॅकवर गंभीर अवस्थेत पडलेल्या दिवाकरला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जेजे हॉस्पिटलमध्ये नेलं. तेथून सायन हॉस्पिटललं नेण्यात आलं. त्याची प्रकृती स्थिर आहे. पण यात त्याला हात गमवावा लागलाय.

आता पुढे काय?

आम्ही पीडित तरुणाचा जबाब नोंदवून घेतलाय. त्याआधारे तक्रार दाखल केलीय. त्याला रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्यात येईल. ते चौघे आरोपी कोणत्या स्थानकावरून ट्रेनमध्ये चढले याबाबतही माहिती हवी, असं रेल्वे पोलिसांनी सांगितलं. या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार अनोळखी व्यक्तींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

SCROLL FOR NEXT