Ganesh Shirsat, the accused in Navi Mumbai, brutally killed his wife over suspicion of infidelity and then tried to kill himself. The murder happened in front of their children, sparking public outrage in Koparkhairane. Saam TV News
मुंबई/पुणे

Navi Mumbai : चारित्र्याच्या संशयाने नवरा सैतान झाला, मुलांच्या डोळ्यासमोरच बायकोची हत्या केली, त्यानंतर...

Navi Mumbai man kills wife over affair suspicion : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा निर्घृण खून केला. चाकूने १५ वार करून आणि डोकं भिंतीवर आदळून बायकोचा जीव घेतला. ही घटना मुलांच्या डोळ्यासमोर घडली. त्यानंतर आरोपीने स्वत:वरही वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

Namdeo Kumbhar

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

Navi Mumbai murder, wife killed by husband : नवी मुंबईमध्ये नवऱ्याने चारित्र्याच्या संशायावरून बायकोची निर्घृण हत्या केली, त्यानंतर स्वत:वरही सपासप वार केले. मुलांच्या डोळ्यासमोरच सैतान बापाने बायकोचा जीव घेतला. या घटनेमुळे नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. बायकोचं बाहेर कुणासोबत तरी लफडं सुरू आहे, असे नवऱ्याच्या डोक्यात वारंवार यायचं, त्यामधूनच त्याने बायकोचा खून केला.

कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये पतीने पत्नीची हत्या करून स्वतः वर वार केल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. गणेश शिरसाट याने चरित्र्याचा संशय घेत पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर स्वत:वरही चाकून सपासप वार केले. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असून जखमी पतीवर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पतीने मुलांच्या समोरच बायकोची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

खारघर मधील दुहेरी हत्येची घटना ताजी असतानाच कोपरखैरणेतील पतीने आपल्या पत्नीचा निघृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या मतिमंद मुलांच्या समोर ( गौरी गणेश शिरसाट ) पत्नीचं डोक भिंतीवर आपटून तसेच चाकूने १०-१५ वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आरोपी पती (गणेश मारुती शिरसाट) याने स्वतः आपला हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना कोपरखैरणे सेक्टर 19 साई बाबा मंदिर समोर, जय भवानी अपार्मेंट मध्ये घडली.

आरोपी गणेश शिरसाट हा बायकोवर चरित्र्यावरून संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीला उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्याचा अधिकारी तपास कोपरखैरणे पोलीस करत आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT