PANDAVKADA WATERFALL TRAGEDY: TWO YOUTHS SWEPT AWAY, SEARCH OPERATION CONTINUES IN KHARGHAR saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: पांडवकडा धबधब्यात दोन तरुण गेले वाहून; शोधकार्य सुरू

Pandavkada Waterfall: खारघर येथील धोकादायक पांडवकडा धबधब्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण वाहून गेले आहेत. अग्निशमन दलाची पथके कसून शोधमोहीम राबवत आहेत, मात्र अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

Bharat Jadhav

खारघर येथील प्रसिद्ध आणि धोकादायक समजल्या जाणाऱ्या पांडवकडा धबधब्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण पाण्याच्या तीव्र प्रवाहात बुडून मयत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल आणि आज अशा दोन दिवसांत या दुर्घटना घडल्या असून, फायर ब्रिगेड (अग्निशामक दल) च्या मदतीने शोधकार्य युद्धपातळीवर सुरू केला मात्र, अद्याप दोघांचेही मृतदेह हाती लागलेले नाहीत.

पावसाळ्यामुळे नवी मुंबईतील पांडवकडा धबधबा पर्यटकांनी फुलून गेला असून मोठ्या संख्येने पर्यटकांनी येथे गर्दी केली आहे. धबधब्याचे मनमोहक सौंदर्य, हिरवाई आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्याचवेळी एक दुर्घटना घडली आहे. दोन तरुण धबधब्यात बुडाले आहेत.

​दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या घटना

​तळोजा फेज १ (सागरविहार बिल्डिंग, जनता गॅरेजजवळ) येथील रहिवासी असलेला मोहम्मद मोबशीर मोहम्मद शाहिद (वय २० वर्षे) हा पांडवकडा परिसरात पाण्याच्या प्रवाहात बुडाला.

​तर दुसरी सांताक्रुझ, मुंबई (कलिना कोबविरी व्हिलेज, घर नं. १०५) येथील रहिवासी असलेला शेण्णोन गॅस्पर किनी (वय १९ वर्षे) हा तरुण धबधब्याच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT