Navi Mumbai Turbhe Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai : नवी मुंबईच्या लॉजमध्ये नको ते उद्योग, पोलिसांनी उद्ध्वस्त केले देहविक्रीचं रॅकेट; ७ महिलांची सुटका

Navi Mumbai Turbhe Crime News : नवी मुंबईत लॉजमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर देहविक्री व महिला तस्करी रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ७ महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली असून ३ आरोपींना अटक झाली आहे.

Alisha Khedekar

  • तुर्भे नाका परिसरातील ‘राज’ लॉजमध्ये देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश

  • बनावट ग्राहकाच्या सापळ्याने व्यवहार उघडकीस

  • ७ महिलांची सुटका, ३ आरोपी अटकेत

  • मुख्य संचालक फरार, शोधासाठी विशेष पथक तैनात

  • अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

नवी मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. तुर्भे नाका परिसरात एका लॉजमध्ये बेकायदेशीर देहविक्री व्यवसायावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ७ महिलांची सुखरूप सुटका केली आहे. पोलिसांनी तरुणींचा सौदा करणाऱ्या ३ आरोपींना अटक केली आहे. मात्र लॉजचा मुख्य मालक फरार आहे. त्याच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानव तस्करी विरोधी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना तुर्भे नाका भागातील एका लॉजमध्ये ग्राहकांकडून पैसे घेऊन महिलांचा आणि तरुणींचा सौदा केला जात आहे. अशा स्वरूपाची गोपनीय माहिती मिळाली होती. माहिती खरी आहे की खोटी याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी युक्ती लढवली.

तयार केलेल्या प्लॅननुसार एका बनावट ग्राहकाला लॉजमध्ये पाठवण्यात आले. सदर बनावट ग्राहकाने महिलांपैकी एका महिलेला पसंती दर्शवली असता, त्याच्याकडून मोबदल्यापोटी ३५०० रुपये स्वीकारण्यात आले. या व्यवहारामुळे देहव्यापार सुरू असल्याची खरी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ छापा टाकला.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत या 'राज' लॉजमध्ये ७ महिलांना देहव्यापारासाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी लॉज व्यवस्थापक अजय कैलास गोस्वामी, महिला पुरवठादार किशोर पूर्णचंद्र साहू आणि वेटर अजय कुमार यांना ताब्यात घेत अटक केली. प्राथमिक तपासात हे आरोपी एकमताने महिलांना / तरुणींना लॉजमध्ये आणून ठेवत, ग्राहकांच्या पसंतीनुसार व्यवहार ठरवत आणि मिळालेली रक्कम आपसात वाटून घेत असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी बनावट ग्राहकाकडून देण्यात आलेली रक्कम जप्त केली आहे. ती या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा मानली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या रॅकेटप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.दरम्यान, लॉजचा संचालक करणाकर शेट्टी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तैनात केली आहेत. नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्रायलचं 'लेझर' अस्त्र; 'आयर्न डोम'पेक्षा 'आयर्न बीम' विध्वसंक, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात धूळवडीला गालबोट,रावणवाडी जलाशयात बोट उलटली

Iran-US War: भारताचं मौन आगतिक की व्यवहारिक? इराणबाबत धोरणाचा भारताला फटका बसणार?

Banarasi Saree Design: बनारसी साड्यांचे एका पेक्षा एक डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Iran-US War: अमेरिका- इराणची अणुब़ॉम्ब चाचणी? जग अणु युद्धाच्या छायेत?

SCROLL FOR NEXT