Vashi Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime News: वाशीमध्ये १५ वर्षांच्या मुलावर रिक्षाचालकाकडून लैंगिक अत्याचार, घटनेने नवी मुंबई हादरली

Vashi Police Station: याप्रकरणी संबंधीत रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी (Vashi Police) अवघ्या काही तासांमध्येच रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या.

Priya More

Vashi News: नवी मुंबईच्या (Navi Mumbai) वाशीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी १५ वर्षांच्या मुलावर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केले आहेत. या घटनेने नवी मुंबई हादरली आहे. याप्रकरणी संबंधीत रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी (Vashi Police) अवघ्या काही तासांमध्येच रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आपल्या मित्रांसोबत वाशी येथील एका मॉलमध्ये फिरण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्याठिकाणी आलेल्या २५ वर्षांच्या रिक्षाचालकाने त्याला मॉलच्या तळमजल्यावर असलेल्या शौचालयामध्ये नेले. त्याठिकाणी आरोपी रिक्षाचालकाने तरुणावर लैंगिक अत्याचार केले. यामुळे पीडि मुलगा प्रचंड घाबरला.

पीडित मुलाने कसाबसा आरोपी रिक्षाचालकाच्या तावडीतून पळ काढला. त्याने थेट घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी तात्काळ वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी आरोपी रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याप्रकरणाचा तपास वाशी पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे नवी मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. याचदरम्यान, नवी मुंबईत एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याची देखील धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Crime : जालना हादरले; जुन्या वादातून तरुणाची हत्या, आई- वडिलांनाही बेदम मारहाण

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी करु नये?

Sanjay Raut : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरले नाहीत, संजय राऊतांचा टोला

Bhagavad Gita: भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात कोणती शिकवण मिळते?

...तर बाळाला फेकून देईन अन् मीही आत्महत्या करेल, PCMC अधिकाऱ्याला महिलेची धमकी|VIDEO

SCROLL FOR NEXT