Navi Mumbai Traffic Police Video Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime: भयंकर! मद्यधुंद कारचालकाने वाहतूक पोलिसाला १२ किलोमीटर फरफटत नेलं; थरकाप उडवणारा VIDEO

Traffic Police Video : पोलिसांनी या कारचा सिनेस्टाईल पाठलाग करत बोनेटवर अडकलेल्या पोलिसाची सुटका केली.

साम टिव्ही ब्युरो

Navi Mumbai Traffic Police Video : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारमध्ये अंमली पदार्थ असल्याच्या संशयावरून वाहतूक पोलिसाने एका कारचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कारचालकाने कारचे ब्रेक न मारता रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

इतकंच नाही तर, कारचालकाने या वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून थेट १२ किलोमीटर अंतरावर नेले. पोलिसांनी या कारचा सिनेस्टाईल पाठलाग करत बोनेटवर अडकलेल्या पोलिसाची सुटका केली. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

व्हिडीओत कारचालक अगदी बेफामपणे गाडी चालवताना दिसत असून कारच्या बोनेटवर पोलिस कर्मचारी अडकलेला दिसून येत आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) विविध चौकातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात हा धक्कादायक प्रकार कैद झाला आहे.

सुदैवाने या घटनेत वाहतूक पोलिसाला कुठलीही दुखापत झाली नाही. सिद्धेश्वर माळी असे वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणात पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं आहे. आदित्य बेंमडे असे आरोपी कारचालकाचे नाव असून तो मध्यपान करून कार चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी (Police) दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिस सिद्धेश्वर माळी हे नेहमीप्रमाणे वाशी येथील सिग्नलवर कर्तव्यास होते. यावेळी त्यांना एका कारमध्ये अंमली पदार्थ असल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने कारचालक आदित्य बेंमडे याला कार बाजूला घेण्यास सांगितले.

मात्र, आरोपीने कार न थांबवता थेट माळी यांच्या अंगावर घातली. कार अंगावर येत असल्याचे लक्षात येताच माळी हे कारच्या बोनेटवर चढले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी आरोपीला कार थांबवण्याची विनंती केली.(Breaking Marathi News)

पण आरोपीने वाशीतून थेट पामबीच मार्गावरुन उरण रोडवर सुसाट वेगाने गाडी चालवली. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच शहरातील पोलिसांनी तातडीने या कारचा पाठलाग सुरू केला. पोलिस विनंती करीत असताना देखील आरोपीने कार थांबवली नाही.

दरम्यान, पोलिसांनी या कारचा पाठलाग करताना उरण रोडवर दोन ट्रेलर आडवे लावले. त्यामुळे अखेर कारचालकाने कार थांबवली. कार थांबताच वाहतूक पोलिस सिद्धेश्वर माळी यांनी सुटकेचा श्वास सोडला. आरोपी कारचालकाला ताब्यात घेतलं असून त्याला वाशी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT