navi mumbai news  saam tv
मुंबई/पुणे

Crime: परदेशातून यायचा, 10 वर्षाच्या बालिकेला दारू पाजून अत्याचार करायचा, आईच मुलीला नराधम म्हाताऱ्याकडे सोडायची

Navi Mumbai News: नवी मुंबई येथील पनवेल तळोजा परिसरात माय लेकीच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडली आहे. लंडनहून आलेल्या एका 70 वर्षीय वृद्धाने 10 वर्षांच्या मुलीवर दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची घटना घडली आहे.

Omkar Sonawane

विकास मिरगने, साम टीव्ही

नवी मुंबई येथील पनवेल तळोजा परिसरात माय लेकीच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडली आहे. लंडनहून आलेल्या एका 70 वर्षीय वृद्धाने 10 वर्षांच्या मुलीवर दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पीडित मुलीची आई पैशाच्या लोभात आरोपीला मदत केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकार सुरू होता अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लंडनमध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धाने भारतात आल्यावर केवळ १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.धक्कादायक बाब म्हणजे, या अत्याचार प्रकरणात त्या मुलीची स्वतःची आईही सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे.त्यामुळे पोलिस अधिकारीदेखील या घटनेने स्तब्ध झाले आहेत. तळोजा पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.३०) दाखल गुन्ह्यानुसार, फारूक अल्लाउद्दीन शेख (वय ७०, मुळ रहिवासी लंडन) हा तळोजा सेक्टर २० मधील एका इमारतीत राहत होता.

त्याने १० वर्षांच्या बालिकेला मद्य पाजून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. हे अत्याचार मागील दोन वर्षांपासून सुरू असल्याचे उघड झाले आहे. अत्याचार उघड झाल्यास मारून टाकण्याची धमकी देऊन आरोपीने पीडितेला गप्प ठेवले होते.या प्रकरणी तळोजा पोलिसांकडे हे प्रकरण आल्यावर तातडीने बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाईला सुरूवात केली. पोलिसांनी पीडितेच्या आईकडे याविषय़ी चौकशी केल्यावर धक्कादायक बाब समोर आली.

पीडितेवर अत्याचार होत असल्याचे माहित असूनही या पीडितेच्या आईने फारूक शेख याच्याकडे घर भाड्याने घेण्यासाठी अडीच लाख रुपये घेतल्याचे समोर आले. तसेच दर महिन्याचे रेशन फारूककडून मिळत असलेल्या रकमेतून तिची आई खरेदी करत असल्याचेही पोलिसांना समजले. फारूक हा बालिकेवर अत्याचार करत असल्याचे माहिती असूनही पीडीतेला राहण्यासाठी फारूकच्या घरी वारंवार पाठवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. अखेर फारूक व पीडीतेच्या आईला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग

Nagpur Pepar Leak: १२ वीच्या पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, निवृत्त उपप्राचार्यानेच फोडला पेपर

Iran Israel War : युद्धाचा भडका! ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणवर मोठा हल्ला, तेहरानमधील तेल प्रकल्प उडवले; VIDEO समोर

Raisin Water Benefits For Skin: रोज सकाळी प्या मनुक्याचं पाणी, त्वचा होईल गुळगुळीत

Anurag Dobhal : १५० च्या स्पीडमध्ये कार, डोळ्यात अश्रू; युट्यूबर अनुराग डोभालचा आत्महत्येचा प्रयत्न, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT