NAVI MUMBAI MURDER CASE: WIFE AND BOYFRIEND ARRESTED FOR KILLING HUSBAND AFTER 11 MONTHS Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : नवी मुंबई हादरली! गळा दाबून नवऱ्याला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून फेकले; बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने काटा काढला

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील ऐरोली येथे प्रेमसंबंधांमुळे पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ११ महिन्यांनंतर पोलिसांनी तपासातून गुन्ह्याचा छडा लावत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये धक्कादायक प्रकार

  • प्रेमात अडथळा असणाऱ्या पतीला पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने संपवलं

  • तब्बल ११ महिन्यांनंतर पोलिसांच्या तपासाला यश

  • आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने संपवलं. सदर घटना नवी मुंबईच्या ऐरोली परिसरात घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. तब्बल ११ महिन्यांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

नेमकं काय प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, बलीराम सूर्यनाथ कुशवाहा (वय ५०) हे ऐरोलीतील यादव नगर येथे पत्नी सुनीता कुशवाहा आणि दोन मुलांसह राहत होते. सुनीता कुशवाहा (वय ४०) हिचे घणसोली येथील ऑटोचालक राहुल दशरथ प्रजापती (वय ३०) याच्याशी प्रेमसंबंध होते. या संबंधांबाबत बलीराम यांनी आक्षेप घेतल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून बलीराम यांचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला.

'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी सुनीताने दोन्ही मुलांना तिच्या बहिणीकडे पाठवले. त्याच रात्री बलीराम घरात झोपलेले असताना सुनीता आणि राहुल यांनी त्यांच्यावर हल्ला केला. गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट व्हावेत यासाठी आरोपींनी मृतदेहाचे तुकडे केले.

कसा फसला गुन्हेगारांचा डाव?

तपासात असेही समोर आले आहे की, मृतदेहाचे वेगवेगळे भाग पोत्यांमध्ये आणि चादरींमध्ये गुंडाळून राहुलच्या ऑटो-रिक्षामधून गवळी देव टेकडी परिसरात नेण्यात आले. तेथे विविध ठिकाणी हे टाकण्यात आले. घटनेनंतर बलीराम बेपत्ता असल्याचे भासवत आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तपासादरम्यान काही संशयास्पद बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी सुनीता आणि राहुल यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या जबाबानंतर सध्या रबाळे एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT