Navi Mumbai Cidco Lottery  Saam TV
मुंबई/पुणे

Navi mumbai Cidco : २५ लाखांत घर, सिडको धमाका उडवणार, ६७२३५ घरं तयार, लॉटरी कधी निघणार?

Navi Mumbai Cidco Lottery 2025 : नवी मुंबईमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल, तर सिडकोकडून लवकरच मोठी लॉटरी निघणार आहे. स्वस्तात मस्त घरे सिडको उपल्बध करून देणार आहे. तळोजामध्ये २५ लाख रूपयांना घर मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

navi mumbai cidco homes : नवी मुंबईत घर घेण्याचा विचार करण्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. नवी मुंबईत सिडकोची तब्बल ६७ हजार २३५ घरे तयार होण्याच्या मार्गावर आहेत. पुढील सहा महिन्यात सिडकोकडून मोठी लॉटरी निघण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ६७ हजार घरं सिडकोकडून तयार करण्यात येत आहेत. तीन टप्प्यांमध्ये घरांची विक्री करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २६ हजार घरांची लॉटरी निघणार आहे.

विमानतळ झाल्यानंतर नवी मुंबईतील घरांच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्व सामन्यांचा कल सिडकोच्या घराकडे जास्त असतात. परवडणाऱ्या किंमतीत सिडकोकडून घरं उपलब्ध करून दिली जातात. वाशी, जुईनगर, कळंबोली, खारघर, तळोजा येथे सिडकोची घरं कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

CIDCO New Projects in Navi Mumbai

प्रधान मंत्री अवस योजनेअंतर्गत (पीएमएवाय) ईडब्ल्यूएस आणि निम्न-उत्पन्न गट (एलआयजी) साठी हे फ्लॅट्स असतील. वाशी ते तळोजा यादरम्यान येणाऱ्या प्रत्येक रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकाजवळ घरं बांधण्यात आली आहे. येथील औद्योगिक क्लस्टर्स आणि ट्रान्सपोर्टेशन हबमध्ये काम करणाऱ्यांना हक्काचे घर मिळणार आहे. ६०० एकरमध्ये ३५० इमारती तयार करण्यात येत आहे. प्रत्येक इमारत ही आठ मजली आहे.

घराची किंमत किती असेल? What is the price of Cidco lottery home in Navi Mumbai?

बामणडोंगरी रेल्वे स्टेशनच्या जवळ सिडकोने ५१०० घरं बांधली आहेत. या घराची किंमत ३० लाख रूपये इतकी आहे. बामणडोंगरीमध्ये खासगी घराच्या किंमतीपेक्षा ही किंमत ४० टक्क्यांनी कमी आहे. त्याशिवाय मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डनर अन् सोयी सुविधाही आहेत. दरम्यान, नुकतीच २५७०० घरांची सिडकोकडून लॉटरी निघाली होती, यातील १९५०० जणांना घरं देण्यात आली आहेत. २०२७ च्या अखेरपर्यंत सिडकोची सर्व घरं तयार होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितेल. खारघर स्टेशनजवळच्या घराची किंमत ९७ लाख रूपये इतकी आहे, तर तळोजा येथील घराची किंमत २५ लाख रूपये इतकी आहे.

सिडकोची ६७ हजार घरं कोणत्या ठिकाणी असतील -

वाशी ट्रक टर्मिनस -(EWS)

जुईनगर रेल्वे स्टेशन -(LIG)

खारघर बस टर्निमल -(EWS)

खारघर रेल्वे स्टेशन -(LIG)

मानसरोवर रेल्वे स्टेशन- (EWS)

बामणडोंगरी रेल्वे स्टेशन- (LIG)

खारकोपर पूर्व रेल्वे स्टेशन -(LIG-EWS)

खारकोपर पश्चिम रेल्वे स्टेशन -(LIG)

तळोजा सेक्टर ३९ -(LIG)

तळोजा सेक्टर २८ -(LIG)

तळोजा सेक्टर २९ -(LIG-EWS)

तळोजा सेक्टर ३१ -(LIG)

तळोजा सेक्टर ३७ -(EWS)

नावडे प्लॉट १ -(LIG)

नावडे प्लॉट २ -(EWS)

कळंबोली बस डेपो -(LIG)

पनवेल बस स्टँड - (EWS)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

Vastu Tips: भाद्रपद महिन्यात तुळशीला अर्पण करा 'ही' खास वस्तू, होतील आर्थिक लाभ

Accident News : मालवाहू गाड्यांची समोरासमोर धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू

पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का; भाजपने पाडले खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला रामराम

Maharashtra Politics: ठाकरे आणि शिंदे एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT