नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर १४ मध्ये भीषण अपघात
जेसीबी आणि मोटारसायकलच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू
पोलिसांनी जेसीबी चालकाला ताब्यात घेतले
विकास मिरगणे, नवी मुंबई
Navi Mumbai Airoli Sector 14 Accident नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर १४ परिसरात आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. न्यू होरायझन स्कूल समोर जेसीबी मशीन आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या अपघाताचा सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सेक्टर १४, ऐरोली येथील न्यू होरायझन स्कूल समोर हा अपघात झाला. जेसीबी चालक हनुमंत मारुती शिंदे (वय २९ वर्षे) याने समोरून येणाऱ्या बजाज अवेंजर मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवर प्रवास करत असलेले दोन तरुण गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या जखमा अतिशय गंभीर असल्याने दोघांचाही मृत्यू झाला.
मृतांमध्ये दिग्विजय बाबासाहेब दिंडे (वय १७ वर्षे, रा. सेक्टर ४ ऐरोली) आणि हर्षद सावर्डेकर (वय १८वर्षे, रा. सेक्टर ८, ऐरोली) यांचा समावेश आहे. दोघेही ऐरोली परिसरातील रहिवासी असून त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस, राबळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत आणि पोलीस निरीक्षक शाम बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या प्रकरणी जेसीबी चालक हनुमंत मारुती शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक होनमाने, पोलीस उपनिरीक्षक रंजना बनसोडे आणि पोलीस उपनिरीक्षक गरड करत आहेत. रबाळे पोलीस स्टेशनकडून अपघाताबाबत पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.