नवले पूल बनतोय कर्दनकाळ; आठ दिवसांत चौथा अपघात (Video)
नवले पूल बनतोय कर्दनकाळ; आठ दिवसांत चौथा अपघात (Video) सागर आव्हाड
मुंबई/पुणे

नवले पूल बनतोय कर्दनकाळ; आठ दिवसांत चौथा अपघात (Video)

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे - नऱ्हे येथील नवले पुल परिसरात आठ दिवसांत चार अपघात झाले आहेत. सेल्फी पॉइंट येथे काल (२८ ऑक्टोबर) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट सेवा रस्त्यावर गेला. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक मात्र या अपघातात जखमी झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

हे देखील पहा -

या घटनेबाबद मिळालेली माहिती अशी की, साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर असणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. दरम्यान, ट्रक महामार्गावरून खाली सेवा रस्त्यावर आला आणि पुढे सेवा रस्त्यालगत असणाऱ्या रॉयल रेस्टो बारच्या पायऱ्यांना धडकला. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक मात्र जखमी असून त्याच्यावर उचार सुरु आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवले पुलावर सहा वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला होता. या अपघात 3 जणांचा मृत्यू झाला होता. तर या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाले होते. त्याआधी (ता. २१) गुरुवारी सायंकाळच्या सुमारास याच ठिकाणी झालेल्या अपघातात दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला होता.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kadaknath Chicken: कडकनाथ कोंबडी काळी असण्याचं कारण नेमकं काय?

Baramati News: २०१४ मध्ये आपण थोडक्यात वाचलो, जानकर कमळावर लढले असते, तर सुफडा साफ झाला असता, अजित पवारांचं विधान

Hair Dye Colors : टक्कल होण्याआधी डायला करा बाय बाय; घरच्याघरी सोप्या पद्धतीने केस करा काळेभोर

Today's Marathi News Live : मोठी बातमी! जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला

Maharashtra Lok Sabha 2024: राज्यात महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार? विजय वडेट्टीवारांनी थेट आकडाच सांगितला

SCROLL FOR NEXT