Nasrapur Case Verdict saam tv
मुंबई/पुणे

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने दिला निकाल, नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी

नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात अवघ्या दीड महिन्यात न्यायालयाने निकाल दिला असून आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये १ मे रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या सव्वा ते दीड महिन्याच्या आतच या प्रकरणाचा निकाल आज जाहीर झाला आहे.

राज्याच्या न्यायालयीन इतिहासात इतक्या वेगाने निकाल लागलेला हा पहिलाच खटला असल्याचं मानलं जातंय. या प्रकरणात भीमराव प्रभाकर कांबळे याला पोलिसांनी अटक केली होती. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी या खटल्याचा निकाल देत आरोपीला दोषी ठरवलं. यावेळी कोर्टात शिक्षेबाबत युक्तीवाद सुरु आहे.

आज कोर्टात काय घडलं?

नसरापूर हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरवलंय. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून विचारले की, त्या घटनेचा प्रसंग आठवून तूच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला हवी. यावर आरोपी भीमराव कांबळेने पुन्हा एक वेगळी कहाणी सांगत न्यायालयाला म्हटलं की, “मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी-शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्या वेळी माझा पाय घसरला आणि मी पडलो, त्याच वेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती सतत ओरडत होती,” असं त्याने सांगितलं.

त्यानंतर न्यायाधीशांनी दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला सांगितलं की, “आता तू जे काही सांगतोयस तो इतिहास आहे, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी?” या प्रश्नावर भीमराव कांबळेने काहीही उत्तर दिलं नाही. गुन्हेगार ठरलेल्या भिमराव कांबळेला कोणती शिक्षा देण्यात यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून न्यायाधीशांसमोर युक्तीवाद सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटात दगडफेक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT