Nashik-Mumbai Highway Saam Digital
मुंबई/पुणे

Nashik-Mumbai Highway : नाशिक मुंबई महामार्गावर दुचाकीला धडक दिल्यानंतर बलगरने घेतला पेट; केबीनमध्ये अडकून चालकाचा होरपळून मृत्यू

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरधाव येणाऱ्या सिमेंट बलगरवरील चालकाचं नियंत्रण सुटून दुचाकीला धडक दिली आणि पेट घेतला. यात केबीनमध्ये अडकल्यामुळे चालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे.

Sandeep Gawade

नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरधाव येणाऱ्या सिमेंट बलगरवरील चालकाचं नियंत्रण सुटून दुचाकीला धडक दिली आणि पेट घेतला. यात केबीनमध्ये अडकल्यामुळे चालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र, कसारा पोलीस, रूट पेट्रोलिंग टीम व मुंबई नाशिक एक्सप्रेस वे च्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून पुढील उपचारासाठी शहापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. तर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवून बलगर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

संभाजीनगरमध्ये भीषण अपघात

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी आहेत. अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. घाटात बस उलटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नरेश मस्के भाजपची चाकरी करतात, काँग्रेस खासदाराची टीका

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीआधी महागाई भत्त्यात होणार वाढ; पगार आणि पेन्शन कितीने वाढणार?

Alu Cha Fadfad Recipe : कोकणात बनवतात अगदी तसेच अळूचं फदफदं, गरमागरम भातासोबत घ्या आस्वाद

Nagpur Crime : नागपुरच्या कारागृहात कैद्यांमध्ये राडा, पाणी भरण्यावरून वाद; पुण्याच्या गँगस्टरकडून जीवघेणा हल्ला

Varun Tej-Lavanya Tripathi : साऊथ अभिनेता वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीला पुत्ररत्न, आजोबा झालेल्या चिरंजीवी यांची नातवासाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT