Nasarapur Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Nasarapur Case: कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा, नसरापूर प्रकरणातील आरोपीचा हादरवून टाकणारा चेहरा समोर

Nasarapur Crime: पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर प्रकरणातील आरोपीबाबत हादरवून टाकणारी माहिती समोर आली. आरोपी गावातील कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा. वृद्ध महिलेवर देखील त्याने अत्याचार केले होते.

Priya More

Summary -

  • नसरापूर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

  • आरोपीच्या भूतकाळाबाबत गंभीर दावे गावकऱ्यांनी केले

  • आरोपी गावातील कोंबड्या, शेळ्या आणि कुत्र्यांवर अत्याचार करून त्यांची हत्या करायचा

  • आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे

सागर आव्हाड, पुणे

नसरापूरमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी भीमराव कांबळे हा विकृत मानसिकतेचा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भीमराव कांबळेला २० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी गावामधून हाकलून लावले होते. विकृत आरोपीच्या गावात सामची टीम गेली. तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. आरोपी पहिल्यापासून विकृत असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितलं. चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर भीमराव कांबळेला अटक करण्यात आली. आरोपीला ७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने आज कोर्टात धक्कादायक दावा देखील केला. 'मला किरकोळ मारामारीसाठी गोवण्यात आले आहे', असा दावा आरोपीने कोर्टात केला.

आरोपी भीमराव कांबळेच्या घराला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याची नोटीस लावली आहे. त्याचा मुलगा धीरज कांबळे यांच्या नावाने नोटीस घरावर लावण्यात आलेली आहे. भीमराव कांबळे गावात राहत होता तेव्हा तो शेतामध्ये शेळ्या चारायला जायचा. तेव्हा तो शेळ्यांवर अत्याचार करत होता. त्याचबरोबर त्याने कोंबड्यांवरही अत्याचार केला आहे. आरोपीने गावात कोंबड्यांवर, शेळ्यावर देखील अत्याचार केला. गावातील महिलांवर आत्याचार केले. भीमराव कांबळे गावात असताना महिला शेतात जाण्यासाठी घाबरत होत्या.

या गावातील एका आजीवर त्याने कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केला होता. आम्हाला देखील त्याची भीती वाटत होती, असे गावातील महिलांनी सांगितले. तो कुत्र्यांवर अत्याचार करायचा आणि कुत्र्यांना फाशी द्यायचा. त्याची विकृत मानसिकता होती. भीमराव कांबळेने त्याच्या मुलींवरही अत्याचार केला आहे. हे त्याच्या पत्नीला माहिती होतं मात्र त्याच्या पत्नीने कुणालाही याबाबत सांगितलं नाही. त्याची बायको त्याला जेलमधून सोडवून आणत होती.

भीमराव कांबळेचा मुलगाही याच मानसिकतेचा आहे. त्याने एका वयोवृद्ध व्यक्तीवर कोयत्याने वार केले होते. भीमराव कांबळे महिलांना पकडण्याचा प्रयत्न करायचा. तो झाडामध्ये लपून बसायचा. पूर्ण गावाने त्याला २० वर्षांपूर्वी वाळीत टाकलं होतं. कोणीही त्यांच्या लग्नकार्यात जात नव्हतं आणि त्यांनाही बोलवत नव्हतं. गावकरी त्याचाशी कुठलाही संबंध ठेवला नव्हते. कांबळे वस्तीमध्ये अजून भीतीचे वातावरण आहे. त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी गावकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT