Narayan Rane : राणे पितापुत्रांची तब्बल नऊ तास चौकशी; शहांच्या फोननंतर सुटका! SaamTvNews
मुंबई/पुणे

Narayan Rane : राणे पितापुत्रांची तब्बल नऊ तास चौकशी; शहांच्या फोननंतर सुटका!

अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवणार, आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही : नारायण राणे

सुरज सावंत

मुंबई : दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची स्वतंत्रपणे तब्बल नऊ तास चौकशी केली. २ ते ७ वाजेपर्यंत नारायण राणे यांची चौकशी करण्यात आली व ७ ते ११ वाजेपर्यंत नितेश राणे या़ची चौकशी करण्यात आली.

हे देखील पहा :

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सॅलियन (Disha Salian) च्या मृत्यूप्रकरणी राणे पितापुत्रांनी सॅलियन हीचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा केला होता. याच प्रकरणी दिशाच्या आईने मुलीची बदनामी होत असल्याबाबत गुन्हा दाखल केला होता.

चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले कि, मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना फोन केला व त्यानंतर पोलिसांनी आमची चौकशी थांबवून आम्हाला सोडले. पुढे बोलताना राणे यांनी, दिशा सॅलियनच्या मृत्यूप्रकरणात तिथे मंत्र्याची गाडी होती याबाबत व सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलून नका असा फोन मला उद्धव ठाकरेंनी केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. तसेच राजकीय हेतूने प्रेरित होऊन आपल्याबाबत हे सर्व कटकारस्थान सुरु असल्याचेही राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Charger: मोबाईलचा चार्जर खराब होण्याआधी कोणती 5 लक्षणं दिसतात?

Maharashtra News Live Update: रत्नागिरी शहरात आजपासून पाणी कपात लागू

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

Famous Actress Death: मराठी मनोरंजन विश्वाला आणखी मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

CPR During Heart Attack: हार्ट अटॅक आला की सीपीआर कधी द्यायचा? जीव वाचवण्यासाठी योग्य मार्ग लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT