नारायण राणे हे नारळासारखे, वरून कठोर असले तरी ते आतून मऊ - चंद्रकांत पाटील Saam Tv News
मुंबई/पुणे

नारायण राणे हे नारळासारखे, वरून कठोर असले तरी ते आतून मऊ - चंद्रकांत पाटील

मी त्यांच्या शैलीचं समर्थन करत नाही. पण त्यासाठी थेट अटक करणं कितपत योग्य आहे? तेही एका केंद्रीय मंत्र्यांना? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणेंची पाठराखण केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर ठिक-ठिकाणाहून अनेक प्रकारच्या प्रतिक्रीया येत आहेत. महाविकास आघाडीने या वक्तव्याचा निषेध केलाय तर, भाजप याबाबत सावध भुमिका घेऊन राणेंची पाठराखण करताना दिसतेय. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील याबाबत आपली सावध प्रतिक्रीया दिली आहे. (Narayan Rane is like a coconut, hard on top but soft on the inside - Chandrakant Patil)

हे देखील पहा -

नारायण राणेंबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''प्रत्येकाची शैली वेगळी असते तशी नारायण राणेंचीही आहे. मी त्यांच्या शैलीचं समर्थन करत नाही. पण त्यासाठी थेट अटक करणं कितपत योग्य आहे? तेही एका केंद्रीय मंत्र्यांना? सरकारने, प्रशासनाने नारायण राणे यांना समज द्यायला हवी होती. मात्र थेट अटक करणं योग्य नाही.'' पुढे ते म्हणाले नारायण राणे हे नारळासारखे आहेत. वरून कठोर असले तरी ते आतून मऊ मनाचे आहेत. त्यांना वाटलं तर ते बोलतील असं पाटील म्हणाले.

त्याचप्रमाणे राणेंच्या अटकेनंतर महाराष्ट्रात त्याचे काय परिणाम होतील याचा विचार सरकारने केला आहे का? राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे. त्याबद्दल त्यांनी विचार केला आहे का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. राणेंच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी गुन्हे दाखल होत असून त्यांच्या जन - आशीर्वाद यात्रेवरही निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. लवकरच ते माध्यमांसमोर येऊन आपली भुमिका स्पष्ट करणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT