narayan rane news  Saam tv
मुंबई/पुणे

Disha salian case : दिशा सालियन प्रकरणाचा कर्ताधर्ता कोण? नारायण राणेंनी केला मोठा दावा, VIDEO

narayan rane on Disha salian case : खासदार नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात मोठा दावा केला आहे. दिशा सालियन प्रकरणाचा कर्ताधर्ता सचिन वाझे असल्याचा दावा राणेंनी केला आहे.

Saam Tv

दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्या नावाचाही समावेश आहे. याच प्रकरणावरून खासदार नारायण राणे यांनी आता खळबळजनक दावा केला आहे. दिशा सालियन प्रकरणाचा कर्ताधर्ता सचिन वाझे असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी राणेंनी दिशा सालियन प्रकरणावरून उद्धव ठाकरेंबाबत मोठा दावा केला. दिशा सालियन प्रकरणाची घटना घडली. त्यावेळी मला उद्धव ठाकरे यांचे दोन फोन आले होते. मी मुंबईतील जुहू येथील घरी चाललो होते. मी वांद्रे ओलांडल्यानंतर एक कॉल आला. मिलिंद नार्वेकर यांचा फोन होता. त्यांनी मला साहेबांना बोलायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर मी कोण साहेब विचारलं. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे असल्याचे सांगितलं.

'मी सुरुवातीला जय महाराष्ट्र साहेब म्हटलं. त्यानंतर त्यांनी तुम्ही अजून जय महाराष्ट्र म्हणता, असं म्हटलं. त्यानंतर मी पटकण उत्तर दिलं. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हाला मुले आहेत. मलाही मुले आहेत. तुम्ही प्रेसमध्ये आदित्यचं नाव घेता. माझी विनंती आहे की, आपण त्याचा नावाचा उल्लेख करू नये'. त्यानंतर मी त्यांना म्हटलं की, 'मी अमुक ठिकाणी कोण आहे, याचा उल्लेख केलेला नाही. मी निपराध मुलीची अत्याचार करून हत्या झाली. मी आरोपींना अटक करण्याविषयी बोलत आहे. तुमचा मुलगा संध्याकाळी कुठे जातो, त्यापासून सांभाळा. त्याला सांगा की, डिनो मोरियाच्या घरी जाऊन तीन-चार काय धुमाकूळ घालतो, हे मला माहीत नाही. मला माहीत आहे, पण तुम्हाला सांगणार नाही. त्यानंतर त्यांनी मी पाहतो, असं सांगितलं, असं नारायण राणेंनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: वर्षाला इक्रिमेंट, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टर; आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

Low Blood Pressure: उभं राहताना किंवा उठताना अचानक चक्कर येते? BPच्या रुग्णांनी वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितलं महत्वाचं कारण

Sambhajinagar Politics: भाजपची खेळी! शिंदेसेनेला सतेतेपासून दूर ठेवलं; ठाकरेंच्या २ सदस्यांना फोडलं

Maharashtra Live News Update : परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष पदी भाजपच्या लता विजयकुमार वाकळे

Dhurandhar 2: पहिल्याच दिवशी २०० कोटी तर एका आठवड्यात ५०० कोटी; रणवीर सिंगचा 'धुरंधर २' करणार नवा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT