Narali Purnima 2024  Saam tv
मुंबई/पुणे

Narali Purnima 2024 : सन आयलाय गो...! कोळी बांधवांकडून नारळी पौर्णिमेचा सण दणक्यात साजरा, जाणून घ्या दिवसाचे महत्त्व

Narali Purnima 2024 in kalyan : कल्याण परिसरातील कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमेचा सण दणक्यात साजरा केला. यावेळी परिसरात कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहाने शोभायात्रेला हजेरी लावली.

Vishal Gangurde

अभिजीत देखमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : कल्याण, अंबरनाथमधील कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेचा सण दणक्यात साजरा केला. कोळी बांधवांनी पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढत दर्याला नारळ अर्पण करत सण साजरा केला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ आणि कोळी बांधवांनी भव्य मिरवणूक देखील काढली. या मिरवणुकीत लहानांपासून ज्येष्ठ मंडळींनी हजेरी लावली.

नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरु होत असल्याने कोळी समाजात नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला विशेष महत्व आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव दरवर्षी पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढतात. या शोभायात्रेत दर्याला नारळ अपर्ण करत शांत होण्याचे आवाहन करतात. कल्याण पूर्वेकडील नांदिवली परिसरातील ग्रामस्थ,कोळी बांधवानी पारंपारिक वेशभूषेत भव्य मिरवणूक काढली.

या शोभायात्रेत मोठ्या उत्साहात कोळी बांधवांनी सहभाग घेतला होता. या मिरवणुकीत लहान मुलांसह,तरुण वृद्ध नागरिक, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. कोळी बांधवांनी मिरवणूकीत वाजत गाजत तलावात नारळ अपर्ण करत सण साजरा केला. कल्याण पश्चिममध्येही आगरी कोळी उत्कर्ष समितीतर्फे देखील मिरवणूक काढण्यात आली होती.

अंबरनाथमध्येही नारळी पौर्णिमा उत्सव साजरा

अंबरनाथमध्येही पाटील कोळी समाजातर्फे नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला. अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिराच्या  प्रांगणात नारळाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक आणि शिव मंदिराचे पुजारी विजय पाटील यांच्यातर्फे ही मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीतील पाटील कोळी समाज प्राचीन शिवमंदिराचा पुजारी समजला जातो. हा समाज या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. शिव मंदिराला मिरवणुकीचे दोन फेरे घेऊन शेजारीच असलेल्या वालधूनी नदीत नारळ विसर्जित करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT