Nana Patole - Bhagat Singh Koshyari Saam TV
मुंबई/पुणे

Nana Patole: राज्यपाल केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करताहेत, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर राज्यपाल काम करत आहेत. लोक हितासाठी केलेले कायदे राज्यपाल थांबवत आहेत.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी काम करत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. राज्य सरकारच्या कायद्यांकडे दुर्लक्ष करत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यावरुन आता पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पेटणार असल्याचं चित्र आहे (Nana Patole Says Governor Bhagat Singh Koshyari Is Worked For Central Govt).

नाना पटोले काय म्हणाले?

"केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) काम करत आहेत. लोक हितासाठी केलेले कायदे राज्यपाल थांबवत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेत याचा उद्रेक होईल. विद्यापीठाच्या कायद्यात बदल करण्यात आला आहे. त्यावर स्वाक्षरी करण्यास विलंब करणे चुकीचे आहे. विधिमंडळात विधेयक मंजूर केले जाते. त्याला जर राज्यपाल अडवत असतील तर ते चुकीचे आहे. भाजप राज्यपालांच्या आडून काम करत आहेत", असा घणाघाती आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारींवर केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

राज्य सरकारने (Mahavikas Aghadi Government) बनवलेल्या विद्यापीठ कायद्याकडे दुर्लक्ष करत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सरकारच्या विद्यापीठ कायद्यानुसार समिती स्थापन करुन ती समिती नावाची शिफारस राज्यपालांना करण्यात येणार आहे. पण, या कायद्यावर राज्यपाल यांनी सही केली नाही.

दुसरीकडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु निवडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पुन्हा पेटणार हे निश्चित आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही; एकनाथ शिंदे यांचं आश्वासन|VIDEO

Maharashtra Farmers : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात, शेतातील कपाशीचं पीक वाया; शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

Maharashtra Live News Update: गेवराईत 3 एकर बागायती जमीन गेली वाहून

Kalyan: कामावर गेला पण परत आलाच नाही, हाय टेन्शन वायरला स्पर्श; विजेचा झटका लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Pandharpur News: पंढरपूरमध्ये शासकीय धान्याचा काळाबाजार उघड – दोन ट्रक जप्त|VIDEO

SCROLL FOR NEXT