मुंबई : राज्यपाल Governor व राष्ट्रपती President हे आमच्या संविधानिक व्यवस्थेमध्ये देशात आणि राज्यात सन्माननीय पद आहे त्यांना सन्मानाने बोलायचे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे भगतसिंग कोश्यारी Bhagat Singh Koshyari काय बोलले त्यापेक्षा महाराष्ट्राची संस्कृती महत्त्वाची आहे आणि त्याचं पालन मी केलं असं म्हणत कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यला प्रत्युत्तर दिलं आहे. 'मला महामहिम कशाला बोलता अनेक असे महामहिम आहे जे चॅम्पियन आहे. माननीय बोला सन्माननीय बोला' असं वक्तव्य राज्यपालांनी नाना पटोलेंना Nana Patole उद्देशून केलं होतं त्यावरती पटोलेंनी वरील वक्तव्य केलं. (Nana Patole reply to the Governor's statement)
हे देखील पहा -
त्यांना महाराष्ट्रात अजून अनेक वर्ष राज्यपाल म्हणून राहायचं असेल आणि त्या मूळे मराठी भाषाही Marathi Language त्यांना आवडायला लागली आणि म्हणून त्यांनी त्याचं कौतुक केलं आमच्या मराठी भाषेचा कौतुक केलं म्हणून त्यांचे मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो असही पटोले म्हणाले.
राज्यपालांनी गृमंत्र्यांकडे मदत मागावी
सध्या राज्यात नैसर्गिक आपत्ती आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले काँग्रेसच्या वतीने मी सरकारला सांगितले आहे की शेतकऱ्यांना आणि गरीब माणसाला मदत केली पाहिजे आणि भरीव मदत केली पाहिजे पण एकूणच सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारच्या तिजोरीची अवस्था झाली आहे घरी मदत करायची असेल तर डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत राज्याला मदत केली पाहिजे ही मोठ्या प्रमाणात केली पाहिजे राज्यपालांनी संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन देशाच्या गृमंत्र्यांकडे मदत मागितली पाहिजे राज्यात जी स्थिती आहे त्याबाबतवत्यानी अवगत केलं पाहिजे हे त्यांचं दायित्व आहे त्यांनी केलं पाहिजे की नाही आता ते महामहिम आहे त्यांना आपण जबरदस्ती करू शकत नाही. रोधकांनी काय मागणी करावी हा नंतरचा भाग पण ते सत्तेतवस्तान काय परिस्थिती होती ते तपासलं पाहिजे 50 हजार ने मदत अपुरी पडेल अशी काँग्रेसची भूमिका आहे.
परिस्थिती खूप वाईट आहे
हाती आलेलं पीक, तोंडातला घास हिसकावला गेला आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. अशा परिस्थिती मध्ये जिल्ह्याचे प्रशासकीय व्यवस्था काम करते की नाही हे पाहण्यासाठी पालकमंत्री त्या ठीकाणी गेले पाहिजे पावसाने खूप नुकसान झालाय पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष हे घातलाच पाहिजे त्यांची जबाबदारी आहे असा घरचा आहेर देखील नाना पटोले यांनी राज्यातील पालकमंत्र्यांना दिला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.