Nana Patole Saam Tv News
मुंबई/पुणे

विधानसभेतील फडणवीसांच्या भाषणाचं नाना पटोलेंकडून कौतुक म्हणाले...

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारवरती धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी सरकारमधील कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहे. या फडणवीसांच्या भाषणाचा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्थेवर भाषण केले मी त्यांचे कौतुक करतो. 2017 मध्ये माझा फोन टॅप झाला आहे. रश्मी शुक्ला यांचा वापर कुणी केला याचे उत्तर सरकारने द्यावे असा प्रश्नही नाना पटोलेंनी विचारला आहे.

दरम्यान राज्यातील विरोधक संपवण्याचे षडयंत्र सरकार करत असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला आहे. आपले विरोधक संपवण्याचे षडयंत्र सरकार करत असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्देश सफल होणार नाही. मी हा पेन ड्राईव्ह अध्यक्षांना आज देत आहे. यामध्ये सरकार कटकारस्थाने कशी शिजवत आहे हे आहे, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीसांनी एसपी आणि सरकारी वकील यांनी ठरवलेला अख्खा प्लान वाचून दाखवला.

पुण्यातील मराठा शिक्षण मंडळाच्या वादात भोईटे गटाच्या वतीने गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक यांनी पाटील गटाला किडनॅप केले, अशी खोटी केस केली दाखल केली. गिरीश महाजन यांना मोक्का लागला पाहिजे, अशी कागदपत्रे तयार केली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण हे सामील आहेत, असंही फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ही कथा खूप मोठी आहे त्यामुळे 25 ते 30 वेब सिरीज होतील. देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आणि भाषणात त्यांनी छगन भुजबळ, अजित पवार, शरद पवार, अनिल देशमुख यांच्या धक्कादायक आरोप केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT