Nalasopara School News x
मुंबई/पुणे

Nalasopara : शिक्षिकेने ८ वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टवर मारला कॉलिन स्प्रे, पालकांच्या तक्रारीनंतर शाळेला कुलूप ठोकलं

School News Nalasopara: नालासोपारा येथील शाळेमध्ये ८ वर्षांच्या मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर शिक्षिकेने कॉलिन स्प्रे मारला. या प्रकरणामुळे झालेल्या चौकशीनंतर शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

Yash Shirke
  • मुंबईजवळच्या नालासोपारामधील शाळेत धक्कादायक प्रकार घडला.

  • एका शिक्षिकेने ८ वर्षीय मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर कॉलिन स्प्रे मारला.

  • या घटनेनंतर सुरु झालेल्या चौकशीतून शाळा कायमची बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

Shocking : मुंबईजवळील नालासोपारा येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. नालासोपारा येथील एका शिक्षिकेने ८ वर्षील मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर कॉलिन स्प्रे मारला. मुलाने हा प्रकार त्याच्या पालकांना सांगितला. पालकांनी या घटनेची तक्रार केल्यानंतर चौकशीतून शाळा कायमची बंद करण्यात आली. या एकूणच प्रकारामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नालासोपारा येथील हॉवर्ड इंग्लिश स्कूलमधील निदाह निजाउद्दीन नावाच्या एका शिक्षिकेने ८ वर्षांच्या एका मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर स्प्रे मारला. पालकांनी या घटनेची तक्रार केली. त्यानंतर शिक्षिकेनी माफी मागितले. या प्रकरणात राज्य शिक्षण विभागाच्या चौकशीमध्ये शाळेने गंभीर गैरवर्तन केल्याचे उघड झाले आणि शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

नेमकं काय घडलं?

२३ जुलै रोजी वर्गात दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीनंतर शिक्षिकेने ८ वर्षीय विद्यार्थ्याच्या गुप्तांगावर कॉलिन स्प्रे केल्याची घटना घडली. विद्यार्थ्याच्या पालकांना जेव्हा हा प्रकार समजला, तेव्हा शिक्षिकेने अधिकृत माफी मागितली. या घटनेनंतर हावर्ड इंग्लिश स्कूल राज्य शिक्षण विभागाच्या रडारवर आले. तपासामध्ये ही शाळा छत्रपती संभाजीनगरच्या वेगळ्या शाळेकडून सोडतीचा दाखल देत असल्याचे समोर आले. यामुळे शाळेची नोंदणी आणि वैधतेबाबत शंका निर्माण झाली.

तपासानंतर आलेल्या अहवालाची दखल घेत पालघर जिल्हा परिषदेने तालुकास्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शाळेला नोटीस बजावली आहे. ही शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शाळेच्या गैरवर्तनामुळे पालक आणि स्थानिक नागरिक यांच्यामध्ये संताप निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT