Nalasopara News Saam Tv
मुंबई/पुणे

Teacher Harassment : विद्यार्थीनीवर शिक्षकाची वाईट नजर, पालकांनी अकॅडमीमध्ये जाऊन दिला चोप, नालासोपाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

Nalasopara News : नालासोपाऱ्यातील IITN अकॅडमीतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालकांनी या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.

Alisha Khedekar

  • नालासोपारा IITN अकॅडमीतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस.

  • संतप्त पालक आणि नागरिकांनी आरोपी शिक्षकाला दिला चोप.

  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

  • घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.

नालासोपाऱ्यात शिक्षकी पेशाला काळिमा ठरणारी घटना घडली आहे. नालासोपारा पश्चिम येथील एका अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल दुबे असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, पालक आणि स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम येथील हनुमान मंदिराजवळ सुप्रसिद्ध IITN अकॅडमी आहे. पीडित मुलगी काही दिवसांपासून या अकॅडमीमध्ये शिकत होती. दरम्यान, आरोपी शिक्षक राहुल दुबे तिच्याशी सतत गैरवर्तन करत असल्याचे समजते. त्याचे वर्तन अधिकाधिक त्रासदायक आणि संशयास्पद होत असल्याने मुलगी धास्तावली होती. शेवटी तिने धैर्य करून आपल्यावर घडणारा छळ आपल्या पालकांना सांगितला. मुलीच्या तोंडून ही बाब कळताच पालकांनी संताप व्यक्त करत थेट अकॅडमी गाठली. तेथे त्यांनी आरोपी शिक्षकाला जाब विचारला असता, पालक आणि स्थानिक नागरिकांनी संतापाच्या भरात त्याला चांगलाच चोप दिला.

यानंतर तातडीने नालासोपारा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन व छेडछाडीच्या गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नालासोपारा पोलीस करत आहेत.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. शिक्षणसंस्था ही सुरक्षिततेचे ठिकाण असावे, पण शिक्षकच जर विद्यार्थिनींवर छेडछाड करत असतील, तर पालकांनी आपल्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करणे साहजिकच आहे. स्थानिकांनी या प्रकाराला “शिक्षणविश्वाला कलंक” असल्याचे म्हणत अकॅडमीविरोधातही रोष व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे नालासोपाऱ्यासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT