Nalasopara Crime Yandex
मुंबई/पुणे

Nalasopara News: हृदयद्रावक! खेळता खेळता बाथरुमध्ये गेला, अन् अनर्थ घडला; १८ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Baby Died After Falling Into Water Tub: बाथरुममध्ये पाण्याने भरलेल्या टबमध्ये खेळत असताना रुद्रचा मृत्यू झाला. रुद्रच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

Priya More

मुंबईनजीकच्या नालासोपाऱ्यामध्ये (Nalasopara) १८ महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या टबमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना नालासोपारा पूर्वच्या जबरपाडामध्ये घडली. रुद्र पिलाना असं या बाळाचे नाव आहे. बाथरुममध्ये पाण्याने भरलेल्या टबमध्ये खेळत असताना रुद्रचा मृत्यू झाला. रुद्रच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्याच्या जबरपाडामध्ये रुद्र आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. बुधवारी दुपारी रुद्र घरामध्ये खेळत होता. त्याचे आई-वडील घरामध्येच होते. खेळता-खेळता रुद्र बाथरुममध्ये गेला. बाथरुममध्ये पाण्याने भरलेल्या टबमधील पाण्यात खेळता खेळता रुद्र टबमध्ये पडला. नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे रुद्रचा मृत्यू झाला.

घरामध्ये खेळणाऱ्या रुद्रचा आवज येत नसल्याचे लक्षात येताच त्याच्या आई-वडिलांनी शोधाशोध केली. तर रुद्र बाथरुममधील टबमध्ये पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ रुद्रला नजीकच्या रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये रुद्रच्या आकस्मिक मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे. रुद्रच्या मृत्यूमुळे त्याच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला.

दरम्यान, अहमदनगरमध्ये विहिरीमध्ये पडलेल्या मांजराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये ६ जण बुडाले. यामधील एकाला वाचवण्यात यश आले. तर इतर ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बायोगॅसच्या खड्ड्यातून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे वाकडी गावावर शोककळा पसरली आहे. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये असलेल्या गॅसच्या वासामुळे चक्कर येऊन ते खड्ड्यात पडल्याचे सांगितले जात आहे. हा खड्डा शेणाने भरलेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT