Nalasopara Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Crime: हवेमुळे तोंडावरील ओढणी उडाली अन्...; 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याची हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

Nalasopara Crime News: नालासोपाऱ्यात प्रियकराच्या मदतीने महिलेने नवऱ्याची हत्या केली होती. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातल्या हडपसरमधून दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Priya More

Summary -

- नालासोपाऱ्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून; ‘दृश्यम’ स्टाईल

- पुण्यात पोलिसांनी ओढणी उडाल्याने आरोपी महिलेला ओळखलं; दोघांना अटक

- आरोपींनी मृतदेह घरात पुरला, त्यावर टाईल्स लावून लपवण्याचा प्रयत्न

- विमा पॉलिसीतून आलेल्या पैशांसाठी हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

मनोज तांबे, नालासोपारा

नालासोपाऱ्यामध्ये एका महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला 'दृश्यम' स्टाईलने संपवलं होतं. नालासोपारा पूर्वेकडील धानिवबागमध्ये ही खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नवऱ्याची हत्या करून आरोपी महिला आपल्या प्रियकरासोबत फरार झाली होती. पोलिसांनी अवघ्या काही तासांत पुण्यातून या दोघांना अटक केली. डोक्यावरील ओढणीने घात केला आणि दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी या दोघांना कशी अटक केली याची माहिती समोर आली आहे.

नालासोपाऱ्यातील या भयंकर हत्याकांडातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पेल्हार पोलिस पुण्यात दाखल झाले होते. तपासाच्या दरम्यान पुण्यातील एका औषध दुकानाजवळ बसलेल्या महिलेच्या तोंडावर असलेली ओढणी हवेमुळे उडाली. या महिलेवर पोलिसांची नजर पडली. ही महिला पोलिसांना आरोपी असल्यासारखे वाटले. पोलिसांनी तिचा पाठलाग केला असता ती आरोपी चमन देवी चौहान असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आरोपींना पुण्याच्या हडपसर येथून अटक केली. चमन देवी चौहान (२५ वर्षे) आणि मोनू शर्मा (२० वर्षे) अशी आरोपींची नावं आहेत. आरोपींनी विजय चौहानची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह घरामध्येच खड्डा खोदून पुरला आणि त्यावर टाईल्स लावली. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपी मोनू शर्मा हा उच्चशिक्षित असून तो मुंबईच्या महाविद्यालयामध्ये T.Y.BSC.IT असे शिक्षण घेत होता. तो नालासोपारा पूर्वेतील धानिव बाग ठिकाणी चमन देवी चौहानच्या बाजूच्या रूममध्ये राहण्यासाठी आला होता. दोघांची ओळख झाली. सुरूवातीला मैत्री झाली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण प्रेमात चमन देवीचा नवरा अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी त्याला संपवण्याचा कट रचत त्याची गळा दाबून हत्या केली. हत्या करण्यात आलेल्या विजय चौहान यांच्या अकाउंटला लाखोंची रक्कम आली होती. ही रक्कम विमा पॉलिसीतून आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ही एक चूक पडू शकते महागात, मिळणार नाही ₹२०००;लगेच चेक करा अपडेट

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Kalyan Local : धक्कादायक! लोकलमध्ये महिलांचा बेक्कार वाद, एकीने दुसरीच्या दंडाचा कचकन चावा घेतला अन्...

Health Care : निरोगी आयुष्यासाठी दिवसातून किती चपाती खाव्यात? जाणून घ्या

Ahilyanagar Tourism : नगरमध्ये निसर्गाच्या कुशीत लपलाय भव्य किल्ला; इतिहास वाचून अभिमान वाटेल, एकदा जाऊनच या

SCROLL FOR NEXT