Naigaon crime Saam tv
मुंबई/पुणे

Naigaon crime : बदलापूरनंतर नायगावमधील शाळेत संतापजनक प्रकार; कँटीनमधील कामगाराकडून ७ वर्षीय मुलीवर अत्याचार

Naigaon crime News : बदलापूरनंतर नायगावमधील शाळेत संतापजनक प्रकार आला आहे. नायगावमधील एका शाळेतील कँटीनमधील कामगाराकडून ७ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही प्रतिनिधी

नायगाव : नायगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूरमधील एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना नायगावमध्येही एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे. नायगावमधील शाळेत ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

नायगाव पूर्वेच्या एका खासगी शाळेत कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने ७ वर्षीय चिमुकालीवर पाच ते सहा वेळा लैंगिक केल्याचं समोर आले आहे. पीडित मुलगी शाळेत दुसरी वर्गात शिकत आहे. संबंधित कॅन्टीन चालक मला त्रास देत असल्याची तक्रार पीडित मुलींनी शिक्षिकेला केली. त्यानंतर शिक्षिकेने मुख्याध्यापकांना सविस्तर माहिती दिली. मुख्याध्यापकांनी हे प्रकरण दडवून न ठेवता त्यांनी थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलींनी या संदर्भात एकदा पालकांना माहिती दिली होती, मात्र पालकांनी गांभीर्यने घेतले नाही.

संबंधित आरोपी मागील १५ दिवसांपासून अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे असून पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. तसेच या अगोदर इतर मुलींवर अत्याचार केला आहे का? याचा तपास देखील नायगाव पोलीस करत आहेत. या शाळेत तिवारी नामक व्यक्ती कॅन्टीन चालवतो. आरोपी असलेला विधीसंघर्षग्रस्त बालक दोनच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातून येथे काम करण्यासाठी आला होता. मुलीचे पालक तक्रार देण्यासाठी तयार नव्हते. मात्र मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हा प्रकार दडवून न ठेवता पोलिसांना माहिती दिली.

'शाळेत मुलांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते. या शाळेत ६५ ते ७० सीसीटीव्ही कॅमेरे असून घडलेला प्रकार दुर्देवी आहे. त्यामुळे आम्ही स्वत:हून पोलिसांकडे तक्रार दिली,असे मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांनी सांगितले. सदर आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती नायगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT