Nagpur Crime News
Nagpur Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Crime News: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुर हादरले! भर रस्त्यात युवकाची भोसकून हत्या

Gangappa Pujari

Nagpur News: देशभरात नववर्षाचे जल्लोशात स्वागत होत असतानाच नागपुर शहर मात्र भीषण हत्येच्या घटनेने हादरले आहे. पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत राजेश मेश्राम नावाच्या युवकाची अज्ञात तीन आरोपींनी तलवार आणि चाकूने भोकसून हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या हत्येने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Nagpur News)

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील कमाल चौक परिसरात सकाळी दहा वाजताच्या दरम्यान थरार पाहायला मिळाला. ज्यामध्ये राजेश मेश्राम या युवकाची हत्या करण्यात आली. मृतक राजेश मेश्राम हा आपल्या दुचाकीवरून कमाल चौक परिसरातील रोडवर एका पान टपरी जवळ थांबला होता .

यावेळी विरुद्ध दिशेने एक अल्टो कार आली त्या कारमधून तीन जण उतरले त्यांच्या हातात तलवार आणि चाकू होते, काही समजायच्या आत त्यांनी राजेशवर वार करायला सुरुवात केली. राजेश रक्तबंबाळ होऊन जीव वाचवण्यासाठी पळत सुटला मात्र आरोपींच्या हातातून तो सुटू शकला नाही. हत्येनंतर आरोपींनी पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या हत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी जुन्या वादातून हत्या झाली असावी अशी शंका पोलीस व्यक्त करत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भर रस्त्यामध्ये हत्येचा थरार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow Teeth Cleaning Tips: दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी या घरगुती टिप्सचा उपयोग करा, दात मोत्यासारखे चमकतील

Maharashtra Monsoon News : मान्सून 12 जूनपर्यंत राज्यात दाखल होणार?

Petrol Diesel Fresh Prices : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा मुंबई पुण्यात महागलं की स्वस्त झालं

Ketan Tirodkar Arrested : माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना अटक; उपमुख्यमंत्री फडणवीसांवर केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; अनेकांची मृत्युशी झुंज, ४० तासानंतरही बचावकार्य सुरूच

SCROLL FOR NEXT