Mumbai Shocking News  Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking News: लघुशंकेला जातो सांगून गेल्या, बाथरूमच्या खिडकीतून उड्या मारून पळाल्या, अनाथाश्रमातून ५ मुली गायब

5 Girls Flee Orphanage: मुंबईतल्या अंधेरीमध्ये असलेल्या एका अनाथाश्रातून ५ मुली पळून गेल्याची घटना घडली आहे. लघुशंकेसाठी गेल्या पण या मुली परत आल्याच नाही. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

मुंबईमधील एका अनाथाश्रमातून ५ मुली पळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरीच्या वीरा देसाई रोडवर असणाऱ्या अनाथाश्रमामध्ये ही घटना घडली. या पाचही मुली अल्पवयीन आहेत. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या पाचही मुलींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीच्या वीरा देसाई रोडवर असलेल्या सेंट कॅथरीन अनाथाश्रमामध्ये ही घटना घडली. मध्यरात्री लघुशंकेसाठी जातो असे सांगून अनाथाश्रमातील ५ मुली गेल्या. बाथरूमच्या खिडकीतून उड्या मारून त्यांनी पळ काढला. पाचही मुली १५ ते १७ वयोगटातील आहेत. या मुली पळाल्यामुळे अनाथाश्रमात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आंबोली पोलिस तपास करत आहेत.

अनाथाश्रमामध्ये सिस्टर म्हणून काम करणाऱ्या महिलेने सांगितले की, २७ मार्चला आम्ही नेहमीप्रमाणे दिनचर्या पूर्ण करून साडेअकरा वाजता झोपलो. त्यानंतर २८ मार्चच्या मध्यरात्री अडीच वाजता अनाथाश्रमाच्या नाईट वॉचमनने मला उठवले आणि सांगितले की, ५ मुली एकापाठोपाठ वॉशरूमला गेल्या. बराच वेळ त्या परत आल्या नाही म्हणून आम्ही बाथरूममध्ये जाऊन तपासले. तर बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून या मुली खिडकीवाटे पळून गेल्याचे दिसून आले.

अनाथाश्रमातील सिस्टर, वॉचमन या सर्वांनी सगळीकडे शोधाशोध केली पण या मुली कुठेच सापडल्या नाही. अनाश्रमाच्या आवातार देखील त्यांना शोधण्यात आले तिथे देखील त्या सापडल्या नाहीत. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या मुलींचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत मुलींचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT