मुंबई/पुणे

Mumbai News: पोलिस भरती परीक्षेत 'मुन्नाभाई' स्टाईलने कॉपी करायला गेले, अन् पोलिसांनी रंगेहाथ पकडले

Latest News: या तरुणांनी कॉपी करण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Priya More

Mumbai Police: मुंबईमध्ये पोलिस (Mumbai Police) भरती प्रक्रिया परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिस भरती परीक्षेत कॉपी करताना पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले. यापैकी तिघांना पोलिसांनी 41 अ ची नोटीस देऊन सोडलेले. तर दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या तरुणांनी कॉपी करण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये रविवारी पोलिस भरतीची परीक्षा (Police Recruitment) पार पडली. मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षाचे केंद्र होते. या परीक्षेदरम्यान पोलिसांच्या डोळ्यात धूळ टाकून कॉपी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. परीक्षेत कॉपी करणाऱ्या या विदयार्थ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतल्या कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे, गोरेगाव पोलिस ठाणे, मेघवाडी पोलिस ठाणे आणि भांडुप पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुन्नाभाई चित्रपटात अभिनेता संजय दत्त ज्याप्रकारे वैद्यकीय परीक्षा पास होतो. तशीच काहीशी पद्धत पोलिस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यानी अवलंबली होती. गोरगाव येथील उन्नत महानगर पालिका केंद्रावर युवराज जारवाल हा तरुण इलेक्ट्रीक इअरबर्डद्वारे अज्ञात व्यक्तीच्या संपर्कात राहून पेपर सोडवत होता. विशेष म्हणजे त्याने उजव्या हातामध्ये मनगटापासून कोपरापर्यंत सनग्लोव्ज आणि त्यामध्ये सिमकार्ड, चार्जिंग सोकेट, मायक्रो माइक असलेले आयताकृती इलेक्ट्रनिक डिव्हाईस असे साहित्य बाळगले होते.

भांडूप आणि मेघवाडी पोलिस ठाणे परिसरातील केंद्रावरही अशाच प्रकारे कॉपी करण्याचा प्रयत्न केला गेला. तर कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे येथील जे बी खोत हायस्कूल केंद्रावर रविंद्र काळे नावाचा तरुण पेनात सिमकार्ड वापरून कानात ब्ल्यू टूथचा वापर करून पेपर सोडवत होता. त्याच्या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविंद्र काळे, नितेश आरेकर, अशोक ढोले या आरोपींना 41 अ ची नोटीस देऊन सोडले. तर युवराज जारवाल, बबलु मेढरवाल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीच्या साथीदारांचाही पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT