कल्याण-डोंबिवली महापालिका एमएमआरडीएच्या निधीतून 7 रस्ते तयार करणार प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कल्याण-डोंबिवली महापालिका एमएमआरडीएच्या निधीतून 7 रस्ते तयार करणार

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामासाठी एमएमआरडीएने ३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून ३१ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामासाठी एमएमआरडीएने ३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून ३१ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यातील ७ रस्त्यांची २८.५९ कोटींची कामे महापालिका करणार असून या रस्त्यांच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत हे रस्ते मार्गी लावण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे अशी माहिती शहर अभियंता सपना देवणपल्ली-कोळी यांनी दिली आहे. (Municipal Corporation will construct 7 roads in Kalyan-Dombivali with the funds of MMRDA)

हे देखील पहा -

याबाबत शहर अभियंता सपना कोळी यांनी सांगितले की एमएमआरडीए निधीतून कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांची काम करण्यात येणार आहे. यातील सात रस्त्यांची कामे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहेत. त्याचे अंदाजपत्रक तयार केले जात असून लवकरच ते मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठविण्यात येईल. मंजुरी मिळताच कामांची निविदा प्रक्रिया काढली जाणार आहे. काम वेगाने पूर्ण केले जाणार आहे.

केडीएमसी करणार असलेले रस्ते आणि रक्कम....

डोंबिवली पूर्व इम्प्रेस मॉल मानपाडा रोड ते शंकेश्वर शाळा, नांदीवली पाडापर्यंत रस्ता बंदिस्त गटार तयार करणे. रक्कम - ४ कोटी

डोंबिवली पश्चिम पोलिस स्थानक वृंदावन सोसायटी ते रिंगरूट पर्यंत रस्ता. रक्कम - ५ कोटी

कल्याण पूर्व विजयनगर चौक ते आमराई पर्यंत यु.टी.डब्लू.टी. पद्धतीने रस्ता रक्कम - ५ कोटी

कल्याण पूर्व नूतन मराठी हायस्कूल ते विनायक चौक ते नाना पावशे चौक पर्यंत यु.टी.डब्लू.टी. पद्धतीने रस्ता. रक्कम - ४.५० कोटी

शिवाजी कॉलनी रस्ता जुनी जनता बॅंक पासून यु.टी.डब्लू.टी. पद्धतीने रस्ता. रक्कम - ५ कोटी

भालगाव कमान पासून ते गावांतर्गत जाणारा २०० मीटरचा रस्ता.  रक्कम - १.७१ कोटी

कल्याण पश्चिम डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड कृष्णा टॉकीज ते मच्छी मार्केट पर्यंत रस्ता.  रक्कम - ३.३८ कोटी

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT