आठवतंय... ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्र्यातील MIM नगरसेविका सहर शेख यांनी विजयी सभेत दिलेलं हे भाषण... त्यांच्या भाषणाची राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चा रंगली होताी. मात्र, मुंब्र्याला हिरवा करण्याची भाषा करणाऱ्या याच सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी ठाण्याच्या राजकारण खळबळ उडवून दिलीये. युनुस शेख यांनी शिंदेसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंच युनूस शेख यांंची 'कळवा-मुंब्रा केबल सेना' अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मात्र त्यांना शिंदेसेनेतल्या प्रवेशाबाबत विचारले असता ते काय म्हटले ते पाहा...
विशेष म्हणजे, य़ुनूस शेख हेे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक होते. मात्र, ठाणे महानगरपालिका निवडणुकीत आव्हाडांनी आपली मुलगी सहर शेखला पक्षाकडून उमेदवारी मिळवून न दिल्यानं युनूस शेख नाराज झाले होते. त्यामुळे सहर शेख यांनी MIMकडून उमेदवारी मिळवून थेट जितेंद्र आव्हाडांना आव्हान दिलं होतं. आता दुष्मन का दुष्मन दोस्त म्हणत शिंदेसेनेनं युनूस शेख यांना गळाला लावलंय. मात्र, ही हड्डी न उगलते बनती ना निगलते अशी वेळ शिंंदेसेनेवर आलीये. त्यामुळे शिंदेसेनेनं आता शेख यांना प्रवेश देणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा दिलाय.
मुंब्रा हिरवा करण्याची घोषणा करणाऱ्या सहर शेखच्या वडिलांचा प्रवेश शिंदेसेनेच्या चांगलंच अंगलट आल्याचं दिसून येतंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.