mumbra fire news saam tv
मुंबई/पुणे

Mumbra Fire News : मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात आग; झगडे चाळीतील दाेन मुलांसह चाैघे जखमी

हाय टेन्शन वायर पडल्याने आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कल्पेश गोरडे

Mumbra Fire News : मुंब्र्यातील शिवाजीनगर भागातील झगडे चाळीत लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले आहेत. फायर ब्रिगेडचे पथक आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. (Maharashtra News)

ठाण्याजवळील (thane) मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या झगडे चाळीत आज आग लागल्याची घटना घडली. या चाळीतील आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या फवा-याने आग आटाेक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

या चाळीतील दोन घरांना आगीच्या झळा बसल्या आहेत. सध्या चाळीतील घरांत माणसं थांबणार नाहीत याची काळजी घेण्यात येत आहे. बहुतांश घरे रिकामी करण्यात आली आहेत. या आगीत एकूण 4 जण भाजले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या जखमींमध्ये एक पुरुष, एक महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. या चाळीच्या वरून जाणारी हाय टेन्शन वायर पडल्याने आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Heat Wave: यवतमाळमध्ये उष्णतेची लाट; ४८ तासात जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू

पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा|VIDEO

Child Eye Care: लहान मुलांना जेवताना मोबाईल देताय? भविष्यात होऊ शकतात मोठे परिणाम, तज्ञांचा गंभीर इशारा

Maharashtra News Live Update: सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

SCROLL FOR NEXT