मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे 1 मे रोजी उद्घाटन
पहिल्या टप्प्यात हलक्या वाहनांना प्रवेश
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना बंदी
मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे उद्घाटन १ मे रोजी होणार आहे. त्यानंतर या मार्गावर वाहतूक सुरू होणार आहे. या मार्गावर ज्वनलशील स्फोटक, इतक पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबत राज्याच्या वाहतूक विभागाने वाहतूकसंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
'मिसिंग लिंक'च्या मार्गावर पहिल्या टप्प्यात १ मे ते ३१ ऑक्टोबर कालावधित हलकी वाहन, बस आणि प्रवासी वाहनांना प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर सहा महिने निरीक्षण केले जाईल. या निरीक्षणानंतर दुसऱ्या टप्प्यात १ नोव्हेंबरपासून मालवाहू वाहनांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राज्य वाहतूक विभागाने स्पष्ट केले.
राज्य वाहतूक विभागाने वेगमर्यादा देखील निश्चित केली आहे. कारसाठी कमाल वेग १०० किमी प्रतितास केली आहे. बस आणि प्रवासी वाहनांना ८० किमी प्रतितास ठेवण्यात आलाय. मर्यायदेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवल्यास चालकावर कारवाई केली जाणार आहे.
मोटार वाहन कायदा १९८८ च्या तरतुदीनुसार ही अंमलबजावणी करण्यात आलीये. अतिरिक्त पोलीस महासंचालकाने वाहतूक सुरक्षित करण्यासाठी मार्ग टप्प्याटप्प्याने खुला करण्याचे आदेश दिलेत. 'मिसिंग लिंक'साठी पहिला टप्प्याचा १ मे ३१ऑक्टोबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधित हलक्या वाहन आणि बसला प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. तर मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
सहा महिन्यानंतर म्हणजे १ नोव्हेंबरनंतर मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना प्रवास करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. वेग मर्यादेचे केवळ ५ टक्क्यांनीही उल्लंघन केल्यास दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. 'मिसिंग लिंक'वर नियमांचे पालन करावे, तसेच जबाबदारीने प्रवास करावा, असे निर्देश देण्यात आलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.