mumbai pune express highway  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार १० पदरी, प्रवास होईल आणखी सुसाट; काय आहे मेगाप्लान?

Maharashtra Government: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एक्स्प्रेस वेवरील प्रवास आणकी सुसाट होणार आहे. कारण हा महामार्ग लवकरच १० पदरी होणार आहे.

Priya More

Summary -

  • मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे १० पदरी होणार आहे

  • एक्स्प्रेस वेच्या विस्तारिकरणाबाबतचा प्रस्ताव एमएसआरडीसी सरकारला पाठवणार

  • १५ हजार कोटींचा खर्च येणार

  • २०३० पर्यंत महामार्ग विस्तार पूर्ण होण्याची शक्यता

मुंबई ते पुणे प्रवास आता अधिक जलद आणि सुरळीत होणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आता दहा पदरी केला जाणार आहे. एमएसआरडीसी लवकरच सरकारला यासंदर्भातला प्रस्ताव पाठवणार आहे.

एमएसआरडीसीकडून येत्या १० दिवसांमध्ये हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे १० पदरी होईल आणि त्यामुळे प्रवास आणखी सुसाट आणि जलद होईल. या महामार्गावरून दररोज ६५ हजारांपेक्षा जास्त वाहनं धावतात. हा महामार्ग अपूरा पडू लागल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचसोबत वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन एमएसआरडीसीने हा महामार्ग १० पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या सहा पदरी असणारा मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आता दहा पदरी केला जाणार आहे. एक्स्प्रेस वेच्या विस्तारीकरणासाठी १५ हजार कोटींचा खर्च येणार आहे. यासाठी आता एमएसआरडीसीकडून हालचालींना देखील वेग आला आहे. त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. हा महामार्ग २०३० पर्यंत १० पदरी केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. ६ पदरी असणारा हा महामार्ग ८ पदरी बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता आठ पदरीवरून हा महामार्ग १० पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे हा ९४.६ किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. सततची वाहतूक कोंडी, अपघात, वाहन चालकांच्या समस्या या सर्वबाबी लक्षात घेऊन हा महामार्ग १० पदरी केला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १३ किमी लांबीच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम देखील केले जात आहे. काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Transferred: दिल्ली पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS अधिकाऱ्यांसह ७० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ऐन धुळवडीत निवडणुकीचा धुरळा उडाला; आसामध्ये काँग्रेसकडून ४२ उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला कुठून संधी?

Maharashtra Live News Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

Wednesday Horoscope : संपत्तीवरून कुटुंबातील मतभेद उघड होणार; बुधवारी ५ राशींच्या लोकांची चिंता वाढणार

मुंबईत परप्रांतीय दोन तरुणांनी काढली विदेशी महिलेची छेड; पोलिसांनी बिहारमधून मुख्य आरोपीला घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT