BKC Pod Taxi NBT
मुंबई/पुणे

Mumbai Traffic: ऑफिसला जा उडत ! मुंबईकरांची होणार ट्रॅफिकपासून सुटका?

BKC Pod Taxi : दररोज धावत पळत ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांची रहदारीमधून सुटका होणार आहे. लवकरच पॉड टॅक्सी सुरू होणार असून यामुळे मुंबईकरांची ट्रॉफिकमधून सुटका होणार आहे.

Tanmay Tillu

मुंबईकरांनो MMRDAच्या कुर्ला ते वांद्रे मार्गे बीकेसीदरम्यान ‘पॉड टॅक्सी’ या अत्याधुनिक वाहतूक प्रकल्पाला केंद्र सरकारचं बळ मिळणार आहे. मोठ्या शहरांचा वाहतुकीचा विकास साधण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याचा फायदा या प्रकल्पाला होणार आहे. त्यामुळे ऑफिसला जाताना ट्रॅफिकच्या कटकटीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलातील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी, तसेच मुंबईत आंतरराष्ट्रीय सेवा-सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीनं वांद्रे रेल्वेस्थानक ते कुर्ला रेल्वेस्थानकादरम्यान स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन प्रणालीअंतर्गत ‘पॉड टॅक्सी’ सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी 1 लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. MMRDAला आर्थिक चणचण भासू नये यासाठी केंद्राकडून आर्थिक बळ मिळण्याचे सकारात्मक संकेत मिळतायत.

पॉड टॅक्सी प्रकल्प कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकू

अशी असेल ‘पॉड टॅक्सी’ सेवा

एकूण 8.80 किमी अंतर कापणार

टॅक्सी डब्याची लांबी - 3.50 मीटर

रुंदी - 1.47 मीटर

उंची : 1.80 मीटर

वेग : ताशी कमाल 40 किमी

स्थानके : 38

मार्ग - वांद्रे ते कुर्ला रेल्वेस्थानक व्हाया BKC

दुरूस्ती डेपो : BKC 5 हजार चौरस मीटरवर

तिकीट दर : 21 रुपये प्रतिकिमी

पॉड टॅक्सी सेवेचा थेट फायदा मुंबईत वाहतूक प्रकल्पांचे जाळे उभे करणाऱ्या MMRDAला होणार आहे. त्यामुळे एकीकडे मेट्रो, अटलसेतू, कोस्टल रोड सारखे प्रकल्प मार्गी लागत असताना त्यात पॉड टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. याचा मुंबईतील वाहतूककोंडी कमी होण्यास निश्चितच फायदा होईल अशी आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT