Mumbai Western Railway Kandivali To Borivali 6th Line Saam Tv
मुंबई/पुणे

Western Railway : मुंबईकरांना दिलासा! विरार लोकल आणखी सुसाट धावणार, पश्चिम रेल्वेचं महत्त्वाचं काम पूर्ण, वाचा

Mumbai Western Railway Kandivali To Borivali 6th Line : कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहावी रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याने विरार फास्ट लोकलची रखडपट्टी आता संपणार आहे. मेल-एक्सप्रेस आणि लोकल आता स्वतंत्र मार्गावर धावणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहावी रेल्वे मार्गिका पूर्ण

  • विरार फास्ट लोकलची रखडपट्टी संपणार

  • मेल-एक्सप्रेस आणि लोकल स्वतंत्र मार्गावर धावणार

  • पश्चिम रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा

  • विरार व डहाणू प्रवाशांसाठी मोठा दिलासा

Western Local Kandivali To Borivali 6th Line मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. विरार फास्ट लोकल अधिक जलद गतीने धावणार आहे. कांदिवली ते बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे विरार लोकलच्या रखडपट्टीची समस्या दूर झाली आहे. मुंबई सेंट्रलपासून बोरिवलीपर्यंत मेल-एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन परस्परांना अडथळा निर्माण न करता स्वतंत्रपणे धावणार आहेत.

रेल्वेच्या पश्चिम मार्गावर महिनाभरात कांदिवली आणि बोरिवली दरम्यान ३२१० किलोमीटर लांबीच्या सहाव्या मार्गिकेचे काम सुरु होते. काही दिवस वेळापत्रकात बदल करत, तसेच ब्लॉक घेत हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. उपनगरी रेल्वेच्या पायाभूत सुविधांमधील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेवर मेल-एक्सप्रेसचे प्रमाण वाढले आहे. त्याचा विरार आणि डहाणूकडे जाणाऱ्या लोकलसेवेवर परिणाम होत आहे.

बऱ्याचदा मेल-एक्सप्रेसच्या अडथळ्यामुळे अप-डाऊन मार्गावरील विरार फास्ट लोकल बोरिवली स्थानकाजवळ रखडत होत्या. याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत असे. याचा आढावा घेऊन पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला गती दिली. हे काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम परिमंडळचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ई. श्रीनिवास व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहाव्या मार्गिकेची सविस्तर तपासणी केली.

त्यानंतर स्पीड चाचण्या घेण्यात आल्या आणि सहावी मार्गिका नियमित रेल्वे वाहतुकीसाठी खुली करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढे मेल-एक्सप्रेसचा लोकल सेवेच्या वेळापत्रकात येणारा अडथळा दूर होणार आहे. बोरिवलीपुढे विरार, डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Attack : मोकाट कुत्र्यांच्या झुंडीचा कहर, मुलीला ओढत नेलं अन् अंगाचे तोडले लचके, ४ वर्षांच्या चिमुकलीचा जागेवरच मृत्यू

Maharashtra Live News Update: चिखलदऱ्यात बिबट्याचा मुक्त संचार..

Mumbai News : मुंबईत धावत्या बसने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली, पहा VIDEO

CM Devendra Fadnavis: राज्यात १५ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Mangalsutra Pendant Design: मंगळसूत्र पेंडंटचे ट्रेडिंग 5 पॅटर्न, साडी किंवा वेस्टर्न लूकवर उठून दिसतील

SCROLL FOR NEXT