Mumbai Tulsi lake Overflow  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Tulsi lake Overflow : गुड न्यूज! मुंबईकरांना मोठा पाणीदिलासा; शहराला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव ओव्हर फ्लो

Tulsi lake Overflow after Heavy rain : मुंबईकरांना मोठा पाणीदिलासा मिळाला आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव ओव्हर फ्लो झाला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साचलं आहे. या पावसाचा तिन्ही रेल्वे सेवांना फटका बसला आहे. यामुळे लोकल सेवा उशिराने धावत आहे. रस्ते वाहतुकीलाही फटका बसला आहे. एकीकडे पावसामुळे नागरिकाचे प्रचंड हाल झालेले असताना दुसरीकडे एक आनंदाची पहिली बातमी समोर आली आहे.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. याआधी मुंबईतील औद्योगिक कारणासाठी वापरात येणारा पवई तलाव भरला. त्यानंतर आता पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरला आहे. तुळशी तलाव भरल्याने मुंबईकरांना मोठा पाणीदिलासा मिळाला आहे.

मुंबईत कृत्रिम तलावापैकी एक असलेला पवई तलाव ८ जुलै रोजी भरला. पवई तलाव हा ८ जुलै रोजी पहाटे ४.४५ वाजता भरून वाहू लागला. ५४५ कोटी लीटर क्षमता असणारा तलाव भरल्याने मुंबईतील उद्योजकांना दिलासा मिळाला. त्यानंतर शहराला पाणीपुरवठा करणारा तलाव भरल्याचे समोर आले आहे. मुंबईला एकूण सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर , तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा एकूण सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव भरल्याने पाणीकपातीतून लवकरच सुटका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमधील तुळशी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पाऊस फायदेशीर ठरल्याचे बोलले जात आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ९.४ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - ५८.२९ टक्के पाणीसाठा

- तानसा - ७६.५८ टक्के पाणीसाठा

- मध्य वैतरणा - ३७. ३१ टक्के पाणीसाठा

- भातसा - ४०.११ टक्के पाणीसाठा

- विहार - ६२.९२ टक्के पाणीसाठा

- तुळशी - १०० टक्के पाणीसाठा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT