Mumbai BMC water supply news Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जरा जपून ठेवा, 'या' भागातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

Mumbai Water Supply News: एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे मुंबईकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. येत्या २४ ते २५ मे दरम्यान मुंबईतील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Satish Daud

एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे मुंबईकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. येत्या २४ ते २५ मे दरम्यान मुंबईतील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, तसेच काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्या मुंबई महापालिकेच्या वतीने गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता येथील उड्डाणपुलाच्या काम हाती घेण्यात आले आहे. या कामात जलवाहिनीचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दोन ठिकाणी १२०० मिलिमीटर व्यासाठी जलवाहिनी वळवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

येत्या २४ मे रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून २५ मे रोजी सकाळी ११.३० या वेळेत करण्यात येणार आहे. परिणामी २४ तासांसाठी घाटकोपर, मुलुंड आणि भांडुपमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारी म्हणून ४ ते ५ दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असेही सांगण्यात आले आहे.

या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

एन विभागातील विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज रुग्णाल आणि गोदरेज प्रॉपर्टीज भागातील पाणीपुरवठा २५ मे मध्यरात्रीपासून सकाळी ११.३० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

त्याचबरोबर एस विभाग – नाहूर (पूर्व), कांजूर (पूर्व) भांडुप (पूर्व), संपूर्ण परिसर, टागोर नगर, कन्नमवार नगर, मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर, सीएट टायर मार्ग लगतचा परिसर, लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT