वाढत्या तापमानामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यानं मुंबईकारांना पाणीकपातीच्या समस्येला सामोरे जावे लागणार होते. परंतु महापालिकेने दिलेल्या नव्या माहितीनुसार, मुंबईकरांची ही समस्या सुटणार असून कोणतीच पाणी कपात केली जाणार नाहीये. महाराष्ट्र सरकारने ‘निभावणी साठ्या’तून मुंबईसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिलंय.
मुंबईला सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो, या सातही जलाशयांमध्ये कमी पाणीसाठी शिल्लक राहिलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्यासाठी मागणी केली होती. सरकारने २,३०,५०० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांनी आज महापालिकेच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.